घरक्राइमटेरेसवरच्या गारव्याला चोरट्यांचे ग्रहण

टेरेसवरच्या गारव्याला चोरट्यांचे ग्रहण

Subscribe

नाणेगावात चोरट्याने मारला दागिने, रोकडवर डल्ला

उकाड्यापासून सुटका करण्यासाठी अनेक नागरिकांनी टेरेसवर झोपण्याचा पर्याय निवडला आहे. मात्र, चोरट्यांना आयती संधी मिळत असल्याचे समोर आले आहे. चोरट्याने बंगल्याचे कुलूप तोडून सुमारे दोन लाख २५ हजार रुपयांचे दागिने व रोकड लंपास केली. ही घटना सोमवारी (दि.८) रात्री दत्त मंदिराशेजारी, भवानीनगर, नाणेगाव येथे घडली. याप्रकरणी विजय काळे यांनी देवळाली कँम्प पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलिसांच्या माहितीनुसार,विजय काळे यांच्यासह त्यांचे कुटुंबियांनी रात्रीचे जेवण केले. उष्णतेमुळे हैराण झाल्याने गारव्यासाठी काळे कुटुंबियांनी बंगल्याच्या टेरेसवर झोपण्याचे ठरविले. त्यानुसार काळे यांनी बंगल्याला बाहेरुन कुलूप लावले. काळे कुटुंबिय टेरेसवर झोपले असताना चोरट्याने विजय काळे व त्यांच्या भावाचे बंद असलेल्या बंगल्याच्या दारांचा कुलूप व कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. चोरट्याने सुमारे दोन लाख २५ हजार रुपयांचे दागिने लंपास केले. यामध्ये मोहनमाळ, चेन, झुबे, वेल, पैंजन, जोडवे याचा समावेश आहे. ४५ हजार रुपयांची रोकड लंपास केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पी. के. गिते करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -