घरमहाराष्ट्रनाशिकवादाच्या पार्श्वभूमीवर सिडकोच्या मुख्य प्रशासक नाशकात; नागरिकांचा घेराव

वादाच्या पार्श्वभूमीवर सिडकोच्या मुख्य प्रशासक नाशकात; नागरिकांचा घेराव

Subscribe

नवीन नाशिक : सिडकोच्या घर व मिळकतीसंदर्भातील कोणत्याही कामांसाठी सिडकोवासियांना कुठेही जाण्याची गरज भासणार नाही. सर्व कामे नाशिक कार्यालयातूनच केली जातील, असा विश्वास सिडकोच्या मुख्य प्रशासक दीपा मुधोळ-मुंडे यांनी व्यक्त केला.

नाशिकचे सिडको कार्यालय बंद करून केवळ चार कर्मचार्‍यांवर येथील जबाबदारी देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्याअनुषंगाने शासनाचे परिपत्रकदेखील जाहीर झाले. शासनाच्या या निर्णयाविरोधात स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रकल्पग्रस्त जमिनीधारकांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यावर सिडको प्रशासनाची भूमिका मांडण्यासाठी व नाशिक कार्यालय बंद केल्यानंतर येणार्‍या अडचणी कशा कमी करता येतील याचा आढावा घेण्यासाठी मुख्य प्रशासक मुधोळ मुंडे यांनी नाशिक कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी सर्वपक्षीय नेते व पदाधिकार्‍यांशी चर्चा करताना त्यांनी आश्वासन दिले.
सिडकोतील २५ हजार घरे पाच हजार भूखंड या सर्व मिळकतींचा मालकी हक्क सिडकोकडे आहे. गेल्या ५० वर्षांपूर्वी सिडकोने या सर्व मिळकती भाडेपट्ट्याने नागरिकांना दिल्या होत्या. यानंतर सिडकोच्या मूलभूत सुविधांचे अधिकार नाशिक महापालिकेकडे देण्यात आले.

- Advertisement -

यामुळे सिडकोचे प्रशासकीय कार्यालय बंद करण्याचा घाट घातला होता. याबाबतचे परिपत्रक सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने सिडकोवासियांनी एकत्रित येत लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. यानंतर सिडको कार्यालय सुरू राहणार असल्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र, दोन दिवस उलटत नाही तोच शासनाकडून पुन्हा एकदा सिडकोच्या १२ कर्मचार्‍यांपैकी आठ कर्मचार्‍यांच्या बदलीचा आदेश काढत चार कर्मचार्‍यांकडे सिडकोचा कारभार सोपविण्यात आला.

सिडकोच्या विविध परवानग्या, ना हरकत दाखले, बांधकाम परवानगी, घेण्यासाठी औरंगाबादचे प्रशासक नियंत्रण ठेवणार असल्याचा आशय परिपत्रकात नमूद होता. यामुळे सिडकोवासियांना विविध परवानग्यांसाठीला जावे लागेल व मानसिक व आर्थिक नुकसान होणार होते. शासनाच्या या अव्यवहार्य आदेशामुळे सिडकोवासियांसह स्थानिक लोकप्रतिनिधी प्रकल्पग्रस्त जमिनीधारकांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. तसेच, सिडको कार्यालयात कायमस्वरूपी प्रशासक ठेवून लवकरात लवकर फ्री होल्डची मागणी केली होती. सोमवारी (दि.१४) सिडकोच्या मुख्य प्रशासक दीपा मुधोळ-मुंडे या नाशिक कार्यालयात कार्यालय कामकाजासाठी आल्याची माहिती मिळताच सकाळपासून सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी व सिडकोवासियांनी सिडको कार्यालयाच्या प्रांगणात गर्दी केली. यावेळी सिडको प्रशासन व प्रशासकां विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. सर्वपक्षीय नेत्यांनी मुख्य प्रशासकांना भेटून विविध मागण्यांचे निवेदने दिले.

- Advertisement -

यावेळी आमदार सीमा हिरे, शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, राष्ट्रवादीचे ज्येष्ठनेते नाना महाले, माकपचे माजी नगरसेवक अ‍ॅड. तानाजी जायभावे, माजी नगरसेवक मुकेश शहाणे, जेष्ठ नेते मामा ठाकरे, बाळासाहेब गीते, संजय भामरे, देवेंद्र पाटील, संतोष सोनपसारे, प्रशांत जाधव, कैलास चुंबळे, अजिंक्य गीते, अमर वझरे, अविनाश पाटील, राहुल सोनवणे, अमोल नाईक, गणेश पवार आदींसह सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांनी आक्रमक पवित्रा घेत प्रशासकांशी सिडकोच्या फ्री होल्डसह विविध मागण्यांबाबत विषयांवर चर्चा केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -