घरताज्या घडामोडीअखेर 'त्या' नोटांचं गूढ उकलल ! पोलीस, नागरिकांनी टाकला सुटकेचा निःश्वास

अखेर ‘त्या’ नोटांचं गूढ उकलल ! पोलीस, नागरिकांनी टाकला सुटकेचा निःश्वास

Subscribe

देवळा तालुक्यातील माळवाडी येथील धवळखडी वस्तीजवळील रस्त्यावर शंभर, दोनशेच्या चलनी नोटा गुरुवारी (दि. 30) रोजी आढळून आल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर  आज ‘त्या’ नोटांच गूढ उकलले आहे. पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांनी व्यक्त केलेला अंदाज खरा ठरला असून त्या नोटा एका शेतकऱ्याच्या असून खिशातून मोबाईल काढताना त्या पडल्या असल्याची माहिती देवळा पोलिसांनी दिली आहे.

देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील खालप येथील यशवंत रमेश सूर्यवंशी नामक शेतकरी कांदा विक्रीसाठी ट्रॅक्टर वरती पिंपळगाव येथे गेले होते. दरम्यान, कांदा विक्री करून वापस येताना सूर्यवंशी यांना मोबाईलवर कॉल आल्याने मोबाईल खिशातून काढत असताना सूर्यवंशी यांच्या खिशातील पैसे खाली पडले. घरी आल्यावर सूर्यवंशी यांनी खिशातील पैसे पाहिल्यावर त्यांच्या लक्षात आले की, आपल्या खिशातील काही रक्कम रस्त्याने पडली असावी. त्यांनी ट्रॅक्टर वरती पाहिले असता ट्रॅक्टरवर काही नोटा अडकून होत्या. दरम्यान, रस्त्यावर नोटा आढळून आल्याची बातमी सर्वत्र व्हायरल झाल्याने त्यांना समजले की त्या नोटा आपल्याच आहेत. त्यांनी देवळा पोलीस स्टेशन गाठत पोलिसांना विक्री केलेल्या कांद्याची पावती दाखवून पुरावा देत त्या नोटा आपल्याच खिशातून पडल्याचं त्यांनी सांगितलं. या बाबत खातरजमा करून देवळा पोलिसांनी सूर्यवंशी यांचे पैसे त्यांना परत केल्याची माहिती राठोड यांनी दिली.

- Advertisement -

 अफवांना बळी पडू नका

चुकीच्या गोष्टी, अफवा सोशल मीडियावर शेअर करू नये. तसे आढळल्यास संबंधितावर कादेशीर कारवाई करण्यात येईल.

- Advertisement -

सुहास देशमुख , पोलीस निरीक्षक देवळा पोलीस ठाणे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -