घरमहाराष्ट्रनाशिकआंतरराज्य टोळीला गुजरातमधून अटक

आंतरराज्य टोळीला गुजरातमधून अटक

Subscribe

जिल्ह्यात रात्री घरफोड्या करून फरार होणार्‍या आंतरराज्य टोळीला ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने गुजरातच्या दुर्गम भागातून अटक केली. त्यांच्याकडून चार लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करत जिल्ह्यातील सात घरफोड्या उघडकीस आणल्या आहेत.

टोळीचा सूत्रधार कांती तेरसिंग भाभोर (रा. खुजरीया जि. दाहोद, गुजरात), नानु आगतराव मंडले (२७, रा. सहकारनगर, जि. दाहोद, गुजरात) व मांदो उर्फ वकिल तेरसिंग भाभोर (रा. खजुरीया, ता. गरबाडा, जि. दाहोद, गुजरात) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांचे साथीदार देवला जोरीया भाभोर, विनु तेरसिंग भाभोर (दोघेही रा.खुजरीया जि. दाहोद, गुजरात) या दोघांचा पोलीस शोध घेत आहेत.

जिल्ह्यातील सटाणा शहर व परिसरात घरफोड्या व दरोड्याच्या घटना सातत्याने घडल्याने आरोपींना अटक करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी दिले होते. त्यानुसार अपर पोलीस अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर, संदिप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संमांतर तपास सुुरू केला. घरफोडीच्या घटनातील सीसीटिव्ही पाहिल्यानंतर चोरटे हे परराज्यातील असल्याचे समोर आले. तांत्रिक विश्लेषणानंतर चोरटे गुजरात व मध्यप्रदेश सीमावर्ती भागातील असल्याचे समोर आले.

- Advertisement -

चोरट्यांच्या ठावठिकाणाबाबत गुप्त माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गुजरातमधील दोहादा या ठिकाणी आले. येथे तीन दिवस मुक्काम ठोकून संशयितांवर पाळत ठेवून या पथकाने चोरट्यांना अटक केली. त्यांना पोलिसी खाक्या दाखवत जिल्ह्यात केलेल्या घरफोडींची कबुली दिली. घरफोडीत आणखी दोन साथीदार असल्याचे सांगितले. त्यांच्या चौकशीत जिल्ह्यातील सटाणा पोलीस ठाण्यातील सहा व वावी पोलीस ठाण्याकडील एक घरफोडीची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून चोरीतील १० तोळे सोने, २५० ग्रॅम चांदी असा ३ लाख ९२ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या टोळीने नाशिक जिल्ह्यासह राज्यातील धुळे, अहमदनगर, पुणे, सांगली या जिल्ह्यांध्येही घरफोड्या केल्याचे समोर येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -