घरक्राइमखटकी गँगच्या दोघांना न्यायालयीन कोठडी; तिघांची पोलीस करणार 2 दिवस कसून चौकशी

खटकी गँगच्या दोघांना न्यायालयीन कोठडी; तिघांची पोलीस करणार 2 दिवस कसून चौकशी

Subscribe

नाशिक : भाजीविक्रेता संदीप आठवलेच्या खूनप्रकरणातील मुख्य संशयित आरोपी ओम्या खटकीसह अनिल प्रजापतीला सोमवारी (दि.२८) न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. उर्वरित ओम चौधरी ऊर्फ छोटा खटकी, साईनाथ गणेश मोरताटे ऊर्फ मॅगी मोर्‍या, बाळा वडनेरे यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने अंबड पोलिसांनी संशयित पाच आरोपींना न्यायालयात हजर केले होते.

मृत संदीप आठवलेने व्हिडीओ रेकॉर्ड करत केलेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी मुख्य संशयित आरोपी ओम्या खटकीने साथीदारांच्या मदतीने खूनाचा प्लॅन आखला. आठ जणांनी संगनमत करत अंबडमधील शिवाजी चौकात संदीपवर गुरुवारी (दि.२४) धारदार शस्त्राने सपासप वार केले. त्यात संदीपचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, ओम्या खटकीने सोशलमीडियावर व्हिडीओ अपलोड करत जेल तर जेल, दोन फटक्यात केला गेम, असे म्हटले असून, त्यावेळी ११२ यूजर्स ऑनलाईन असल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

काहीजणांनी त्याच्या व्हिडीओला कमेंटसुद्धा दिल्या आहेत. खूनाच्या घटनेनंतर अवघ्या तीन तासांत अंबड पोलिसांनी आठ जणांच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी ओम प्रकाश पवार ऊर्फ मोठा ओम्या खटकी, ओम चौधरी ऊर्फ छोटा खटकी, साईनाथ गणेश मोरताटे ऊर्फ मॅगी मोर्‍या, अनिल प्रजापती, बाळा वडनेरे यांना अटक केली. पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी पाच आरोपींना शुक्रवारी (दि.२५) न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना सोमवार (दि. २८) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने पोलिसांनी पाच आरोपींनी सोमवारी पुन्हा न्यायालयात हजर केले. न्यायालयाने ओम्या खटकी व अनिल प्रजापती यास न्यायालयीन कोठडी व उर्वरित तिघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

आठवले खूनप्रकरणात आरोपींनी धारदार शस्त्र कोठून व कोणाकडून घेतले, याचा तपास केला जात आहे. न्यायालयाने तिघांना पोलीस कोठडी सुनावली. : शेखर देशमुख, सहायक पोलीस आयुक्त, नाशिक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -