घरताज्या घडामोडीअपहरणातील मुलाचा मारहाणीत मृत्यू

अपहरणातील मुलाचा मारहाणीत मृत्यू

Subscribe

राजूर बहुलामध्ये फेकलेला मृतदेह दिसला होता गुराख्याला

किरकोळ वादातून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून अंबडमध्ये रिक्षातून अपहरण केलेल्या अल्पवयीन मुलाचा मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी तीन संशयित आरोपींना ताब्यत घेतले आहे. राजा सिंग (वय १६ रा. स्वामीनगर, नाशिक) असे मृत मुलाचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, २४ नोव्हेंबर रोजी राजा सिंग याचे संशयीतांसोबत भांडण झाले होते. राग मनात धरून संशयितांनी २५ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास राजा सिंगचे अंबड बसस्थानक परिसरातून अपहरण केले. त्यास एका खडीक्रशर परिसरात आणत बेदम मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला. तो मयत झाल्याचे लक्षात आल्यानंतर संशयतांनी राजा सिंगचा मृतदेह राजूर बहुला परिसरानजीक एका हॉटेलनजीक नेऊन फेकून दिला. गुराख्यास राजा सिंगचा मृतदेह दिसून आल्याने वाडीवर्‍हे पोलिसांना अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र, राजा सिंग याचे वडील गब्बर सिंग यांनी अंबड पोलिसात अपहरण केल्याबाबत गुन्हा दाखल केला होता.
अंबड पोलिसांना माहितीदाराने दिलेल्या माहितीनुसार, मयत राजा सिंग याचे अपहरण करण्यात आले होते. यातील संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत संशयित तिघांनीकेलेल्या मारहाणीत राजा सिंग याचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात संशयित आरोपींविरोधाविरोधात खूणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वसंत खतेले करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -