घरक्राइमशिवमहापुराण कथा सोहळ्यात १ किलो ४७ ग्रॅम सोनेचोरी; ५२ लाखांच्या दागिन्यांवर...

शिवमहापुराण कथा सोहळ्यात १ किलो ४७ ग्रॅम सोनेचोरी; ५२ लाखांच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला

Subscribe

शिवमहापुराण कथा सोहळ्याच्या पाच दिवसांत ५६ महिलांच्या गळ्यातील तब्बल १ किलो सत्तेचाळीस ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, सोनसाखळी चोरट्यांनी हातसफाई केल्याच्या तक्रारी इंदिरानगर पोलीस ठाण्यात करण्यात आले आहे. ५२ लाखांचे दागिने चोरी करीत चोरट्यांची एकप्रकारची दिवाळी साजरी झाली.

पाथर्डी गावात २१ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत शिवमहापुराण कथा सोहळ्यासाठी नाशिक शहरासह संपूर्ण राज्यभरात या ठिकाणी दररोज लाखो भाविकांनी कथा श्रवणासाठी उपस्थिती दर्शवली होती. त्यात लाखो महिलांचा समावेश होता. अनेकजण कुटुंबिय मुक्कामी आले होते. या ठिकाणी गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी ब्लेड कटरच्या सहाय्याने तब्बल ५६ महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी मंगळसूत्र लांबविण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात सोनसाखळी तसेच मंगळसूत्र चोरी गेल्याची ५६ महिलांनी तक्रार दाखल केली आहे.

- Advertisement -

पोलिसांनी पाच दिवसांत पाच गुन्हे सोनसाखळी चोरीचे दाखल करत ५६ महिलांना साक्षीदार केले आहे. विशेष म्हणजे, ३०० पोलिसांचा चोख बंदोबस्त असतानाही शेकडो महिलांचे मंगळसूत्र चोरी गेल्याने महिलांनी नाराजी व्यक्त केली आहे. पोलिसांनी कोणत्याही चोरट्यांचा शोध घेतलेला नसल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. पोलिसांनी अनेकदा सोनसाखळी, सोन्याचे दागिने परिधान करू नये, असे आवाहन केले असताना देखील महिलांनीही सोन्याचे दागिने घालून शिवपुराण कथा सोहळ्यात गर्दी केली होती. त्यामुळे चोरट्यांनी ही संधी साधत दागिन्यांवर डल्ला मारला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -