लासलगावी विक्रमी कांदा आवक

‘गुरुवारपासून डाळींब लिलावास सुरूवात’

Lasalgaon has the highest onion import

नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांचे लिलावाचे कामकाज 24 मेपासून सुरू झाल्यानंतर गेल्या 25 दिवसांत लासलगाव बाजार समितीत विक्रमी कांदा आवक झाली असल्याची माहिती बाजार समितीच्या सभापती सौ. सुवर्णा जगताप यांनी दिली.

जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव विचारात घेऊन जिल्हाधिकार्‍यांनी 12 ते 23 मे अखेर कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करून सर्व बाजार समित्यांचे शेतीमाल लिलावाचे कामकाज बंद केले होते. 24 मे पासून सर्व बाजार समित्यांचे लिलाव पूर्ववत सुरू झाले. दि. 24 ते 20 जून दरम्यान लासलगाव मुख्य, निफाड, विंचूर उपबाजार आवारांवर 1143141 क्विंटल कांद्याची विक्रमी आवक होऊन रु. 1714711500 इतक्या रकमेची उलाढाल झाली आहे.
मागील वर्षी वरील कालावधीत बाजार समितीच्या मुख्य, निफाड व विंचूर उपबाजार आवारांवर 625747 क्विंटल कांद्याची आवक होऊन रु. 501849094 इतक्या रकमेची उलाढाल झाली होती. त्यामुळे मागील वर्षाच्या वरील कालावधीतील कांदा आवकेच्या तुलनेत चालू वर्षी लासलगाव मुख्य, निफाड व विंचूर उपबाजार आवारांवर 517394 क्विंटल कांद्याची जादा आवक होऊन रु. 1212862406 इतक्या रकमेची जादा उलाढाल झाली आहे. त्याचप्रमाणे ह्या कालावधीत मागील वर्षापेक्षा सध्याच्या सरासरी बाजारभावात देखील 700 रूपयांनी वाढ झाली आहे.सद्यस्थितीत कांद्याचे सरासरी बाजारभाव स्थिर असून शेतकरी बांधवांनी त्यांचा कांदा हा शेतीमाल योग्य प्रतवारी करून विक्रीस आणण्याचे आवाहन सभापती सुवर्णा जगताप यांनी केले आहे.