घरताज्या घडामोडीसावतावाडीतला शिकारी बिबट्या अखेर जेरबंद, महिनाभरापासून दहशत होती कायम

सावतावाडीतला शिकारी बिबट्या अखेर जेरबंद, महिनाभरापासून दहशत होती कायम

Subscribe

वनविभागाची मोहीम फत्ते, स्थानिकांसह शेतकऱ्यांनी सोडला सुटकेचा निश्वास

तरसाळी – बागलाण तालुक्यातील वटार येथील सावतावाडी वस्तीत धुमाकूळ घालत दररोज जनावरांची शिकार करणाऱ्या बिबट्याला अखेर वनविभागाने जेरबंद केलं. गेल्या एक महिन्यापासून हा बिबट्या दररोज शेतकऱ्यांच्या दुभत्या जनावरांचा बळी घेत होता. मात्र, अखेर वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बकरी खाण्याच्या नादात हा बिबट्या अडकला.

गेल्या चार ते पाच महिन्यांपासून या भागात बिबट्यांची दहशत कायम आहे. त्यातच काही दिवसांपासून एका बिबट्याने मोठी दहशत निर्माण केली होती. मेंढपाळांच्या मेंढ्या उचलून नेणाऱ्या या बिबट्याने भरदिवसा अनेकदा शेतकऱ्यांना दर्शन दिलं होतं. वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी बरेच प्रयत्न केले, मात्र, बिबट्या हुलकावणी देत होता. हा बिबट्या अखेर पिंजऱ्यात जेरबंद झाल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडणार असल्याची माहिती तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत खैरनार यांनी दिली. गेल्या २८ तारखेला या बिबट्याने वामन दशरथ बागूल यांच्या राहत्या घराजवळ त्यांचा चार वर्षीय नातू कार्तिकवर हल्ला केला होता.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -