घरताज्या घडामोडीVitthal Rukmini Darshan : जेष्ठ नागरिक, गर्भवती महिलांनाही मिळणार पंढपूरच्या विठ्ठल रूक्मिणी...

Vitthal Rukmini Darshan : जेष्ठ नागरिक, गर्भवती महिलांनाही मिळणार पंढपूरच्या विठ्ठल रूक्मिणी मंदिरात प्रवेश

Subscribe

कार्तिकी वारीच्या निमित्ताने पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर दर्शनासाठी २४ तास खुले ठेवण्यात येणार आहे.

गेली दीड वर्ष कोरोनाच्या काळात अत्यावश्यक सेवा वगळता अनेक सेवा ठप्प झाल्या होत्याच, त्याचबरोबर राज्यातील मंदिरेही बंद ठेवण्यात आली होती. मात्र ७ ऑक्टोबरला घटस्थापनेच्या मुहुर्तावर राज्यातील प्रार्थना स्थळे,मंदिरे,धार्मिक स्थळे भाविकांना दर्शनाकरिता खुली करण्यात आले. या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातही दर्शनाकरिता भाविकांना सोडण्यात आले.यासंदर्भातच विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची बैठकीत निर्णय घेऊन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या दर्शनाची व्यवस्था करण्यात आली. या बैठकीत दररोज १० हजार भाविकांना मुखदर्शन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र यासाठी दर्शनासाठी नियमावली जाहीर करण्यात आली. यासाठी श्री विठ्ठल मंदिरात दर्शनाकरीता १० वर्षांखालील मुले, ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिलांना सरकारच्या आदेशानुसार दर्शनासाठी बंदी कायम ठेवली होती. मात्र, आता जेष्ठ नागरिक, गर्भवती महिलांनाही पंढपूरच्या विठ्ठल रूक्मिणी दर्शन होण्यासाठी मंदिरात प्रवेश मिळणार आहे.

दर्शनासाठी येणार्‍या भाविकांची कोरोना चाचणी करणे सक्तीची केलेली नसून,मंदिरांमध्ये काम करणार्‍या सर्व कर्मचार्‍यांची कोरोना चाचणी सक्तीची केली आहे. दर्शन रांगेत आल्यानंतर सर्व भाविकांची आरोग्य तपासणी केली जात आहे. तासाला सातशे ते हजार भाविकांना विठ्ठल रुखमाई दर्शनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. यामध्ये ५० टक्के ऑनलाईन आणि ५० टक्के ऑफलाईन दर्शन दिले जात आहे.

- Advertisement -

पंढरपुरात यावर्षी १५ नोव्हेंबरला कार्तिकी यात्रा होणार

यंदा पंढरपूरात विठ्ठलाची कार्तिकी वारी सोहळा पार पडणार आहे. येत्या १५ नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी साजरी होणार आहे. पंढरपूरातील कार्तिकी वारी ही अवघ्या महाराष्ट्रासाठी मोठा उत्सव असतो. यावर्षी कार्तिकी यात्रेला जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. कोरोनाच्या नियम आणि अटींचे पालन करून १५ नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी यात्रेचा मुख्य सोहळा साजरा करण्यात येणार आहे. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते श्री विठ्ठलाची शासकीय महापुजा होणार आहे. कार्तिकी वारीच्या निमित्ताने पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर दर्शनासाठी २४ तास खुले ठेवण्यात येणार आहे.


हे ही वाचा :- Narendra Modi : पंढरपूरच्या पालखी मार्गांचे आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन, ‘असा’ असेल यापुढील पालखी मार्ग

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -