घरताज्या घडामोडीमालेगावच्या अपर जिल्हाधिकारीपदी धनंजय निकम

मालेगावच्या अपर जिल्हाधिकारीपदी धनंजय निकम

Subscribe

मालेगावचे अप्पर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांना तडकाफडकी हटवून त्यांच्या जागी नंदुरबारचे भूसंपादन उपजिल्हाधिकारी धनंजय निकम यांची नियुक्ती करण्यात आल्याचे समजते. मालेगाव शहरांमध्ये करोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत आहे. एकीकडे प्रशासन करोनाचा संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने प्रशासन प्रयत्न करत असतानाच दुसरीकडे मात्र अधिकाऱ्यांची असे तडकाफडकी बदली करण्यात आल्यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे. निकम नंदुरबारचे भूसंपादन उपजिल्हाधिकारी असून त्यांची बढतीवर बदली करण्यात आल्याचे समजते. निकम यांनी यापूर्वी भुसावळ उपविभागीय अधिकारी तसेच जळगाव निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे . सध्या ते नंदुरबार येथे भूसंपादन उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते.

विविध चर्चांना उधाण

मालेगावचे अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांची तडकाफडकी बदली का करण्यात आली याविषयी प्रशासकीय वर्तुळामध्ये आज दिवसभर चर्चांना ऊत आला होता. मात्र, मालेगावमध्ये करोनाचा वाढता संसर्ग रोखण्याच्या दृष्टिकोनातून अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली की काय अशीही चर्चा आहे. याच कारणास्तव मागील दोन दिवसांपूर्वी कळवणचे उपविभागीय अधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांची मालेगावचे घटनात्मक व्यवस्थापक म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे या चर्चेला अधिकच पुष्टी मिळाली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्याच आठवड्यात राऊत यांच्यावरील कारवाईचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आल्याचे देखील समजते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -