घरमहाराष्ट्रनाशिकबाजार समिती निवडणूक : इगतपुरीत इच्छुकांची भाऊगर्दी; एकूण १५९ अर्ज दाखल

बाजार समिती निवडणूक : इगतपुरीत इच्छुकांची भाऊगर्दी; एकूण १५९ अर्ज दाखल

Subscribe

नाशिक : इगतपुरी तालुक्यातील घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरू असतानाच प्रत्येक पक्षात इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. यंदा प्रथमच बाजार समिती निवडणुकीसाठी सर्वपक्षीय नेते सरसावले आहेत. यात युवकांची संख्या मोठी आहे. तर, आजी-माजी आमदार समोरासमोर येत असल्याने या निवडणुकीकडे सर्वाधिक लक्ष लागून आहे. सोमवारी (दि.३) अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बाजारसमिती आवाराला यात्रेचे स्वरूप आले होते.

आतापर्यंत सहकारी संस्थेच्या ११ जागांसाठी १०५ अर्ज दाखल झाले. तर, ग्रामपंचायतीच्या ४ जागांसाठी ४३ अर्ज, माथाडीच्या १ जागेसाठी ३ अर्ज आले. तर, व्यापार्‍यांच्या २ जागांसाठी ९ अर्ज आले. आतापर्यंत १५९ अर्ज भरण्यात आल्याची माहिती निवडणूक अधिकार्‍यांनी दिली. भाजप व शिवसेना शिंदे गट एकाच पॅनलच्या रूपाने उमेदवारी अर्ज दाखल करणार होते. मात्र, अखेरच्या दिवशी भाजपने स्वतंत्र अर्ज दाखल केले. तर शिंदे गटाने स्वतंत्र अर्ज दाखल केले.

- Advertisement -

विशेष म्हणजे बाजार समितीचे सर्वेसर्वा अ‍ॅड. संदीप गुळवे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव व खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन ज्ञानेश्वर लहाने यांनी आज अर्ज दाखल केला. यावेळी माजी आमदार शिवराम झोले, माजी आमदार निर्मला गावित, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गोरख बोडके, सुनील जाधव, भाऊसाहेब खातळे कचरू पा. डुकरे आदी अग्रस्थानी होते. तर, माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांनी शिंदे गटाकडून अर्ज भरले. तसेच, रघुनाथ तोकडे, अलका काळे, अनिता घारे, रखमाबाई मेंगाळ यांनीही अर्ज भरले. यावेळी संपत काळे, उदय जाधव, माजी आमदार पांडुरंग गांगड उपस्थित होते. सोसायटी गटातून डॉ. दत्ता सदगीर व सोसायटी गटातून अरुण पोरजे यांनी अर्ज दाखल केला. जनार्दन माळी यांच्या नेतृत्वाखाली प्रकाश तोकडे, ज्ञानेश्वड तोकडे, अतुल माळी यांनी अर्ज भरले. उत्तम भोसले, भास्कर गुंजाळ, भोलानाथ चव्हाण हे उपस्थित होते. भाजपतर्फेही अर्ज दाखल झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -