घरक्राइमकिरकोळ वाद; पत्नीची डोक्यात दांडके घालून हत्या

किरकोळ वाद; पत्नीची डोक्यात दांडके घालून हत्या

Subscribe

नाशिक : निफाड तालुक्यातील शिरवाडे वणी येथे पत्नीच्या माहेरीच पतीने किरकोळ वादातून तिचा लाकडी दांडके डोक्यात घालून खून केल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, खून करून संशयित पती फरार झाला आहे. याबाबत पिंपळगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, दिंडोरी तालुक्यातील एकलहरे येथील जान्हवी नामदेव महाले (वय २४) ही आपल्या माहेरी निफाड तालुक्यातील शिरवाडे वणी येथे पती नामदेव उत्तम महाले यांच्यासोबत आलेली होती. त्यावेळी तिचे आणि तिच्या पतीचे किरकोळ वाद झाले. त्या वादाचे रूपांतर जोरदार भांडणात झाल्याने पत्नी जान्हवी महालेच्या डोक्यात संशयित पती नामदेव महाले याने लाकडी दांडक्याने जोरदार वार करून तिला गंभीररित्या जखमी केले. यात तिच्या डोक्यात जबर मार लागल्याने जान्हवीचा जागीच मृत्यू झाला.

- Advertisement -

पत्नी मयत झाल्याचे लक्षात येताच संशयित आरोपी नामदेव उत्तम महाले (रा. एकलहरे) हा घटनास्थळावरून फरार झाला. या घटनेची माहिती मिळताच अशोक बाळू वाघ यांनी पिंपळगाव पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. त्यानुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक कुणाल सपकाळे व पोलीस कर्मचारी फरार आरोपीचा शोध घेत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -