मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी, गणपती उत्सवामुळे गावी जाणाऱ्यांच्या संख्येत वाढ

express highway

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोडींची झाली असून बोरघाटात अमृतांजन पुलाजवळ एक ते दीड किमीपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लावल्या आहेत. गणपती उत्सवामुळे गावी जाणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. विकेंडसाठी गावी जाणारे चाकरमानी आणि गणेश भक्तांची वाहने मोठ्या प्रमाणात एक्स्प्रेस वेवर आली आहेत.

मागील काही दिवसांपासून या महामार्गावर वाहतूक कोंडी होताना दिसत आहे. सलग येणाऱ्या सुट्टया, आगामी गौरी-गणपती उत्सव यामुळे गावी जाणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. तसेच काही खोटी-मोठी कामं देखील महामार्गावर सुरू आहेत. काल (शुक्रवार) देखील दोन तासांसाठी वाहतूक बंद करण्यात आली होती.

या महामार्गावर काल दुपारी बारा ते दोन असे काम सुरू होते. मात्र, अडीच तासानंतर हा रस्ता वाहन चालकांसाठी मोकळा करण्यात आला होता. या महामार्गावर अधूनमधून वाहतुकीचा अंदाज घेऊन कामे होत आहेत. तसेच काही कामांवर प्रवासी आणि नागरिकांकडून रोषही व्यक्त करण्यात येत आहे.

ट्रॅफिक आणि रहदारीमुळे या महामार्गावर अनेक अपघात देखील होतात मात्र, या एक्स्प्रेस वेवरील अपघातांची दखल घेण्यात आली. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूनंतर अनेकांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली. दरम्यान या महामार्गावर नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. अपघाताचे प्रमाणही वाढले आहे.
काल स्वागत फलक बसवण्यात आला. मात्र, या महामार्गावर किमान सुविधा पुरवण्यात याव्यात, त्यासाठी पैसा खर्च करावा, अशी मागणी वाहनधारक करीत आहेत.


हेही वाचा : पुणे-सोलापूर महामार्गावर दरोडेखोरांची लूट, 3 कोटी 60 लाखांचा माल लंपास