घरमहाराष्ट्रनाशिकराजकीय दबावाला कंटाळून आमदार पतीचा राजीनामा?

राजकीय दबावाला कंटाळून आमदार पतीचा राजीनामा?

Subscribe

विरोधी पक्षातील नेत्यांना चौकशीच्या धमक्या देवून त्यांना पक्षामध्ये प्रवेश दिला जात असल्याचा आरोप भाजप नेत्यांवर होत असतानाच राज्याचे जलसंपदामंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या त्रासाला कंटाळून काँग्रेसच्या आमदार निर्मला गावित यांचे पती रमेश गावित हे कार्यकारी अभियंतापदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा आहे.

विरोधी पक्षातील नेत्यांना चौकशीच्या धमक्या देवून त्यांना पक्षामध्ये प्रवेश दिला जात असल्याचा आरोप भाजप नेत्यांवर होत असतानाच राज्याचे जलसंपदामंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या त्रासाला कंटाळून काँग्रेसच्या आमदार निर्मला गावित यांचे पती रमेश गावित हे कार्यकारी अभियंतापदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा आहे. नाशिकहून त्यांची धुळे जिल्ह्यात बदली झाल्यानंतर ‘मॅट’कडे त्यांनी अर्ज दाखल केला आहे. त्याची सुनावणी सोमवारी (दि. ५) होणार असल्याने त्यानंतर कार्यभार सोडण्याचे संकेत विश्वसनीय सूत्रांनी ‘आपलं महानगर’कडे व्यक्त केली.

३० वर्षांपासून जलसंपदा विभागात वेगवेगळ्या पदांवर रमेश गावित यांनी सेवा बजावली आहे. सेवानिवृत्तीसाठी आता अवघे दोन वर्ष शिल्लक असताना त्यांची नाशिकच्या महाराष्ट्र इंजिनिअरींग रिसर्च इन्स्टिट्यूट (मेरी) या संस्थेत बदली झाली. अर्थात, ‘मेरी’तून यापूर्वीच त्यांची जलसंपदा विभागात बदली झालेली होती. त्यामुळे पुन्हा त्याच संस्थेत जाणीवपूर्वक बदली केल्याचे बोलले जाते. यानंतर पालकमंत्र्यांनी त्यांची बदली धुळे येथे करुन आपल्या मर्जीतील स्वीय सहाय्यक संदीप जाधव यांना त्या जागेवर बसवले. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या घडामोडी घडत असताना गावित रजेवर असल्याचे सांगण्यात येते. रजेवर असतानादेखील जाधव यांनी त्यांचा पदभार स्विकारत कामकाज सुरू केले.

- Advertisement -

आमदार निर्मला गावित यांनी पालकमंत्र्यांकडे याविषयी तक्रार मांडली होती. मात्र, त्यांनीही दुर्लक्ष केल्यामुळे कार्यकारी अभियंता गावित यांनी अखेर महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट) कडे या बदलीविरोधात दावा दाखल केला आहे. त्याची सुनावणी येत्या सोमवारी होणार असून, यात अंतिम निर्णय होणे अभिप्रेत आहे. बदलीचा निर्णय झाला तरी चौकशीचा ससेमिरा मागे लागेल या भितीपोटी त्यांनी येत्या सप्टेंबर महिन्यात तीन महिने वैध ठरणारा ‘व्हीआरएस’ची तयारी चालवली आहे. तथापि, विरोधी पक्षातील आमदारांना या पध्दतीने त्रास दिला जात असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रभारी आमदार भाई जगताप यांनी नुकताच नाशिकमध्ये केला होता. त्याची परिणती म्हणून गावित यांच्या राजीनाम्याकडे बघितले जात आहे.

लोकसभेपूर्वीच केली होती तयारी

लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच गावित यांनी राजीनामा देण्याची तयारी सुरू केली होती. कुटुंबातील सदस्यांनी विरोध केल्यामुळे सेवानिवृत्तीचा अर्ज मागे घेतला. आता विधानसभा निवडणुकीपूर्वीच राजकीय वातावरण तापल्याने पुन्हा राजीनाम्याचा विषय ऐरणीवर आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -