घरमहाराष्ट्रनाशिकजिल्हा परिषदेत आचारसंहिता कक्ष

जिल्हा परिषदेत आचारसंहिता कक्ष

Subscribe

नाशिक : विधानसभा निवडणुकीची आदर्श आचार संहितेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषदेत आचार संहिता कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षात दोन प्रमुख अधिकारी व चार कर्मचारी यांचा नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी भूवनेश्वर एस. यांच्या आदेशन्वये स्थापन या कक्षामध्ये ग्रामपंचायत विभागाचे सहाय्यक गटविकास अधिकारी (ग्रामपंचायत) राजेंद्र देसले हे नियंत्रण अधिकारी म्हणून काम करतील. याशिवाय ग्रामपंचायतीचे विस्तार अधिकारी सुहास शिंदे (सहाय्यक नियंत्रक अधिकारी), ग्रामपंचायतींचे कनिष्ठ प्रशासन अधिकारी प्रदीप बागुल (मदतनीस), लेखा व वित्त विभागाचे सहाय्यक लेखा अधिकारी नितीन पाटील (मदतनीस), प्राथमिक शिक्षण विभागाचे कनिष्ठ सहाय्यक विश्वास कचरे (मदतनीस), बांधकाम १ चे वरिष्ठ सहाय्यक विलास आहेर (मदतनीस) म्हणून काम पाहतील. विधानसभा निवडणुकी संदर्भात येणारे पत्रव्यवहार, तक्रारी यांचे निराकरण करावे. या कक्षाने थेट प्राप्त होणार्‍या विविध तक्रारी तसेच विभाग प्रमुखांकडे प्राप्त झालेल्या तक्रारींवर तात्काळ कार्यवाही करुन त्याचा अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर करावयाचा आहे.

जिल्हा परिषदेत शुकशुकाट

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्यामुळे जिल्हा परिषदेत कार्यालयातील कामकाजावर परिणाम दिसत आहे. आचारसंहिते कामे नसल्याने, काही कर्मचार्‍यांना निवडणुकीची जबाबदारी दिलेली असल्याने तसेच काही कर्मचारी निवडणूक प्रशिक्षणासाठी असल्यामुळे कार्यालयात शुकशुकाट पसरल्याचे चित्र आहे.

- Advertisement -

विधानसभेची निवडणुक १४ स्पटेंबर रोजी जाहीर झाली. निवडणुकीची आचारसंहिता जाहिर झाल्यापासून जि. प. पदाधिकारी, सदस्यांनी झेडपीकडे पाठ फिरविली आहे. कामेच नसल्याने कार्यकर्ते कार्यालयाकडे फिरकत नाही. त्यामुळे नियमित कामकाजावर देखील परिणाम जाणवत आहे. यातच बहुतांश विभागप्रमुखांना निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच अधिकारी, कर्मचारी निवडणुक शाखेने बोलावून घेतले आहेत. त्यामुळे बहुतांश कार्यालयात सर्वच विभागात शांतता पसरली दिसत आहे. आचारसंहिता असल्याने का होईना अधिकार्‍यांना लोकप्रतिनिधींच्या आदेशापासून काहीकाळ मोकळीक मिळाली आहे.

अनेकांनी कामाचा ताण हलके झाल्याचेही खाजगीत सांगत आहे. दुसरीकडे कार्यालयात येणारे सामान्य नागरिकांनाही आचारसंहितेचे कारण दिले जात आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना खालीहात जावे लागत आहे. याशिवाय काही अधिकारी, कर्मचारी सदस्य व पदाधिकारी यांचे फोन देखील उचलत नसल्याच्या तक्रारी आहेत. एरवी अनेक छोटेमोठे प्रश्न घेऊन जि.प. त येणारे कार्यकर्ते, ठेकेदार यांची संख्या ही रोडवली आहे. आचारसंहिता असल्यामुळे पदाधिकार्‍यांच्या कक्ष सुनसान पडलेले आहेत. पदाधिकारी येत नसल्याने सदस्यांनी जि.प. कडे पाठ फिरविली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -