घरताज्या घडामोडीकांदाप्रश्नी शेतकरी झालेत बेजार, मात्र नाशिकचे जिल्हाधिकारी चक्क अनभिज्ञ

कांदाप्रश्नी शेतकरी झालेत बेजार, मात्र नाशिकचे जिल्हाधिकारी चक्क अनभिज्ञ

Subscribe

नाशिक : कांदा प्रश्नी (onion issue) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी जपानमधे असूनही लक्ष घातले असतांना नाशिक जिल्हाधिकारी जलज शर्मा मात्र याप्रश्नी अनभिज्ञ असल्याचेच दिसून आले. सदरचा प्रश्न हा केंद्र सरकारच्या अखत्यारित असल्याने जिल्हा स्तरावर याबाबत कोणताही निर्णय घेता येत नसल्याचे हतबल उत्तरे देण्यात जिल्हाधिकार्‍यांनी धन्यता मानली. प्रत्यक्षात व्यापार्‍यांंना संप मागे घेण्याची विनंती देखील जिल्हा प्रशासनाकडून करण्यात न आल्याने शेतकर्‍यांबाबत जिल्हा प्रशासन किती गंभीर आहे याची प्रचिती आली.

नाशिक हे कांद्याचे आगार आहे. निर्यात शुल्कवाढीच्या निर्णयानंतर नाशिकमध्ये बाजार समित्यांमधून लिलाव बंद झाल्याने देशाचे सरकार हलले. अगदी केंद्रिय सहकारमंत्री अमित शहा यांनी याची दखल घेतली. मात्र नाशिक जिल्हा प्रशासनाकडून संप मागे घेण्याकरीता कोणतेही प्रयत्न होतांना दिसून येत नाही. राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी या प्रश्नी लक्ष घालण्याचे निर्देश दिल्यानंतर नाशिक जिल्हाधिकार्‍यांनी कांदा व्यापार्‍यांची बैठक बोलावली खरी; मात्र व्यापार्‍यांशी चर्चा करण्यासाठी प्रशासनाला सरकारच्या निर्देशाची वाट पाहावी लागली हे विशेष.

- Advertisement -

या बैठकीत तोडगा काढण्यात जिल्हा प्रशासनाला अपयश आल्याने लिलाव ठप्पच आहेत. याउलट शेतकरी व कांदा व्यापार्‍यांनी कांद्याच्या प्रश्नावर सरकारकडून ज्या समित्या नेमल्या जातात, त्यांच्या कार्यपध्दतीवर रोष व्यक्त केला. या समित्यांनी दिलेल्या चुकीच्या माहितीमुळे सध्याचा तिढा निर्माण झाल्याकडे व्यापारी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी बोट ठेवले. केंद्र सरकारने नाशिक जिल्हयातील कांदा परिस्थितीबाबत जिल्हा प्रशासनाकडून माहिती मागवली आहे. मात्र जिल्हयात लागवडीखालील कांदा क्षेत्र, उपलब्ध कांदा, जिल्हयातील कंटेनरची संख्या याची माहितीही प्रशासन देऊ शकले नाही.

नाफेडकडून एक हजार क्विंटल कांदा खरेदी

शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. सरकारच्या घोषणेनंतर मंगळवारी दुपारपासून तातडीने हे खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. त्यानुसार नाशिक जिल्ह्यात २२ केंद्र तर नगर जिल्ह्यात ४ अशा २६ केंद्रांवर दिवसभरात एक हजार क्विंटल कांदा खरेदी करण्यात आला. नगर जिल्हयात कांद्याला सर्वाधिक २१९७ रूपये प्रती क्विंटल असा दर मिळाला तर नाशिक जिल्हयात २४१० रूपये दर मिळाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -