घरक्राइमआधार आश्रमाची पोलखोल : पोलीस घेणार पीडित मुलींसह एअरगन विक्रेता, साथीदारांचा शोध

आधार आश्रमाची पोलखोल : पोलीस घेणार पीडित मुलींसह एअरगन विक्रेता, साथीदारांचा शोध

Subscribe

संशयित आरोपी हर्षल मोरे ऊर्फ सोनू सर यास १४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी

नाशिक : बहुचर्चित द किंग फाउंडेशन संचलित ज्ञानदीप गुरुकुल आधार आश्रमात सात मुलींचे लैंगिक शोषण करणारा संशयित आरोपी हर्षल मोरे ऊर्फ सोनू सर यास न्यायालयाने गुरुवारी (दि.८) सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. मोरे यास पहिल्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी मिळताच पोलिसांनी सखोल तपासाठी दुसर्‍या गुन्ह्यात पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी न्यायालयाकडे केली होती. न्यायालयाने ती मागणी मान्य करत मोरेला सात  दिवसांची पोलीस कोठडी सुनावली .

म्हसरूळ शिवारातील मानेनगरमधील ज्ञानदीप गुरुकुल आधार आश्रमाचा अध्यक्ष हर्षल मोरे याने २०१८ ते २३ नोव्हेंबर २०२२ या काळात मुलींचे लैंगिक शोषण केले. पोलिसांनी लैंगिक शोषण केलेल्या सात मुली व त्यांच्या पालकांचे जबाब घेतले असून, जबाब नोंदणी पूर्ण झाली आहे. पोलिसांनी सटाण्यातील मोरेच्या घरातून एअरगन जप्त केली आहे. ही गन पोलिसांनी फॉरेन्सिककडे पाठवली आहे. शिवाय, सटाणा येथील मोरेच्या घरातील नातेवाइक व शेजारील नागरिकांचीही चौकशी केली. पोलीस चौकशीदरम्यान द किंग फाउंडेशनच्या विश्वस्तांना कागदपत्रे सादर करता आली नसल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी ज्ञानदीप आधार आश्रम ‘सील’ केला असून, सर्व विद्यार्थिनींना पालकांच्या ताब्यात दिले आहे. हर्षल मोरेविरुद्ध म्हसरूळ पोलीस ठाण्यात सात गुन्हे दाखल झाले आहेत. त्याला पहिल्या गुन्ह्यात न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. दुसर्‍या गुन्ह्यात पोलीस कोठडीची पोलिसांनी केली होती. ती मागणी न्यायालयाने मान्य केली.

  • पोलीस घेणार हर्षल मोरेच्या साथीदारांचा शोध घेऊन त्यांचे जबाब.
  • गुन्हे संख्याने वाढल्याने हर्षल मोरेच्या अडचणीत होणार वाढ
  • चौकशी समिती घेणार आश्रमाचा आढावा
  • पोलीस घेणार आश्रम सोडून गेलेल्या पीडित मुलींसह पालकांचे जबाब
  • पोलीस शोधणार एअरगन विक्रेत्याचा ठाठिकाणा आणि त्याचा घेणार जबाब.
  • मोरेने एअरगनचा वापर कधी व कोठे केला याचा पोलीस शोध घेणार.

ज्ञानदीप आधार आश्रमामध्ये मुलींचे लैंगिक शोषण करणार्‍या संशयित आरोपी हर्षल रामकृष्ण मोरे यास न्यायालयाने दुसर्‍या गुन्ह्यात सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या गुन्ह्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. सखोल तपासासाठी मोरे यास सात दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी न्यायालयाकडे केली. न्यायालयाने ती मागणी मान्य केली.
– अ‍ॅड. डॉ. सुधीर कोतवाल, विशेष सरकारी वकील

प्रमोद उगलेhttps://www.mymahanagar.com/author/pramodu/
3 वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय.डिजिटल, प्रिंट मीडियाचा अनुभव. मनोरंजन, लाईफस्टाईल विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -