घरताज्या घडामोडीनाशकात रेल्वेचा कर्मचारी करोनाबाधित

नाशकात रेल्वेचा कर्मचारी करोनाबाधित

Subscribe

मालेगावत २ नवे पॉझिटिव्ह रुग्ण

नाशिक जिल्हा प्रशासनास सोमवारी (दि.१८) दिवसभरात ५९ रिपोर्ट प्राप्त झाले. यामध्ये चार पॉझिटिव्ह, ५४ निगेटिव्ह व तांत्रिक कारणातून दोन रिपोर्ट परत पाठवण्यात आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये दोनजण मालेगाव शहर, नाशिक शहर व निफाड तालुक्यातील उगाव येथील एकाचा समावेश आहे. नाशिक शहरातील ५३ वर्षीय करोनाधित रुग्ण मध्य रेल्वेचा कर्मचारी असून बिटको पॉईंट शेजारील गायकवडा मळा परिसरातील रहिवाशी आहे. कर्मचार्‍यामध्ये करोनासदृश्य लक्षणे आढळून आल्याने त्याच्यावर रेल्वेच्या रुग्णालयात उपचार सुरु होते. त्याच्या घशाचे नमुने तपासणीसाठी खासगी लॅबला पाठविले असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. ही बाब आरोग्य विभागास समजताच रुग्णास उपचारार्थ नाशिकरोड येथील करोना विलगीकरण कक्षात दाखल केले. कर्मचारी करोनाबाधित आहे का नाही, या खात्रीसाठी आरोग्य विभागाने पुन्हा त्याच्या घशाचे नमुने तपासणीसाठी लॅबला पाठवले. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचा आरोग्य विभागास प्राप्त झाला. आरोग्य विभागाने खबरदारी म्हणून त्याच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाइन केले आहे.

नाशिक जिल्ह्यात आरोग्य विभाग, प्रशासन, पोलीस, स्वच्छता कर्मचार्‍यांनी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होवू लागली आहे. सोमवारपर्यंत 800 करोनाबाधित रुग्णांपैकी ५91 रुग्ण करोनामुक्त झाल्याने सर्व यंत्रणांना दिलासा मिळाला आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकसुद्धा मास्कचा वापर व सामाजिक अंतर ठेवत असल्याने जिल्ह्यात करोना आटोक्यात येऊ लागल्याचे रुग्णसंख्येवरुन दिसून येत आहे. सोमवारी प्रशासनास चार रुग्ण करोनाबाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाले. यामध्ये २१ व ५१ वर्षीय पुरुष मालेगावातील, ३० वर्षीय पुरुष उगाव (ता.निफाड) आणि ५३ पुरुष नाशिक शहरातील आहे. जिल्ह्यात ३७६ रुग्णांवर उपचार सुरु आहे. यामध्ये जिल्हा रुग्णालय ११५, नाशिक मनपा रुग्णालय ११, डॉ. पवार वैद्यकीय महाविद्यालय ५८, मालेगाव मनपा रुग्णालय ९९ आणि नाशिक ग्रामीण रुग्णालय येथे ९३ रुग्णांवर उपचार चालू आहे.

- Advertisement -

उगावमधील रुग्णाचे मुंबई कनेक्शन

काही दिवसांपुर्वी मुंबई येथील ३० वर्षीय पुरुष रुग्ण उगाव (ता.निफाड) येथे आला. ही बाब आरोग्य विभागास व ग्रामपालिकेस समजतास त्यास होमक्वारंटाइन करण्यात आले. त्याच्या घशाचे नमुने तपासणीसाठी पाठविले असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर खबरदारी म्हणून ग्रामपंचायतीने गावातील सर्व रस्ते व दुकाने बंद केले आहेत.

- Advertisement -

१६७ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु

जिल्ह्यातील ८०० करोनाबाधित रुग्णापैकी ५९१ रुग्ण बरे झाले असून १६७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यामध्ये नाशिक ग्रामीण ४२, नाशिक शहर १३, मालेगाव शहर ११०, जिल्ह्याबाहेरील दोन रुग्णांचा समावेश आहे. या करोनाबाधित रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नाशिक ग्रामीणमध्ये ६२, नाशिक शहर ३२, मालेगाव ४६९, आणि जिल्ह्याबाहेरील २८ रुग्ण बरे झालेले रुग्ण आहेत.

३४३ रिपोर्ट प्रलंबित

नाशिक जिल्ह्यात सोमवारपर्यंत ७ हजार ५५९ संशयित रुग्णांच्या घशाचे नमुने तपासण्यात आले. यामध्ये ८०० रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह व ६ हजार ४१६ रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. ३४३ संशयित रुग्णांचे रिपोर्ट प्रलंबित आहेत.

सोमवारी १०४ रुग्ण दाखल

करोनासदृश्य लक्षणे असलेले व संशयित १०४ रुग्ण सोमवारी रुग्णालयात दाखल झाले. यामध्ये जिल्हा रुग्णालय ३२, नाशिक मनपा रुग्णालये ६, डॉ. पवार वैद्यकीय महाविद्यालय १, मालेगाव मनपा रुग्णालये २३, नाशिक ग्रामीण रुग्णालय येथे ४२ रुग्ण दाखल झाले आहेत.

नाशिक करोना अहवाल

पॉझिटिव्ह रुग्ण 800
मालेगाव शहर — -619 (मृत ४०)
नाशिक शहर —–47 (मृत २)
जिल्ह्या बाहेरील—-३०
नाशिक ग्रामीण —-10४
(नाशिक तालुका-9, चांदवड-4, सिन्नर-8, दिंडोरी-9, निफाड-1६, नांदगाव-6, येवला-33, कळवण-1, सटाणा-2, मालेगाव ग्रामीण -१६)
एकूण बरे झालेले – 5९१

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -