घरताज्या घडामोडीराजापूर : सापाच्या जुळणीची खोल विहिरीतून सुटका

राजापूर : सापाच्या जुळणीची खोल विहिरीतून सुटका

Subscribe

येवला तालुक्यातील राजापूर येथील संजय गोपाळा वाघ यांच्या विहिरीत पडलेल्या सापाच्या जुळणीची सुटका करण्यात यश आले.

वाघ यांनी विहिरीत सापाची जुळण पडल्याची माहिती वनसेवक पोपट वाघ यांना दिली. वनसेवक वाघ यांनी नांदगाव येथील सर्पमित्र विजय बडोदे यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधलाच ते घटनास्थळी दाखल झाले व सुमारे पन्नास फूट खोल विहिरीत पडलेल्या जुळणीला जीवदान दिले. येवल्याचे वनपरीक्षेत्र अधिकारी संजय भंडारी यांच्या मार्गदशनाखाली वन्यजीव वाचवून त्यास निसर्गाच्या सानिध्यात सोडावे म्हणून सर्पमित्र विजय बडोदे प्रयत्नशील आहेत. यावेळी विजय वाघ, किरण दराडे, मच्छिन्द्र मगर, प्रवीण वाघ, पवन नाईकवाडे, रामा वाघ, नितीन गोसावी, साईनाथ वाघ, राजेंद्र वाघ आदी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -