घरमहाराष्ट्रनाशिकपहिल्या दिवशी उडाला फज्जा : बाजारपेठेत ना पास, ना पोलीस

पहिल्या दिवशी उडाला फज्जा : बाजारपेठेत ना पास, ना पोलीस

Subscribe

नियमावली कागदावरच; नागरिकांचा मात्र गोंधळ

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठांमध्ये पास दिल्यानंतरच प्रवेश जाणार आहे. मात्र, मंगळवारी (दि.२९) पहिल्याच दिवशी मेन रोडवरील बाजारपेठेमध्ये पास देण्यासाठी महापालिकेचा एकही कर्मचारी दिसून आला नाही. तसेच नाकाबंदीच्या ठिकाणी पोलीस दिसून आले नाही. त्यामुळे पहिल्या दिवशी निर्बंधाचा फज्जा उडाल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, नागरिकांना नवीन नियमांनुसार पास देण्यासाठी पहिल्या दिवशी महापालिकेकडे उपलब्ध नसल्याने एकही कर्मचारी बाजारपेठांमध्ये पास वितरणासाठी दिसून आला नाही. नियम फक्त कागदोपत्रो आहेत का, प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होणार आहे, पास कोठे मिळणार आहे, हे समजत नसल्याने दुकानमालक, कर्मचारी व ग्राहकांमध्ये संभ्रमावस्था दिसून आली.

डेल्टा प्लस व्हेरिएंटचा प्रादूर्भाव वाढू नये, यासाठी निर्बंध कडक करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिलेत. नाशिकमध्ये कोरोनाचा धोका टाळण्यासाठी पोलिसांनी मास्टर प्लॅन तयार केला आहे. बाजारपेठेत ग्राहकांनी गर्दी करु नये, यासाठी नाशिककरांना एक तासासाठी मोफत पास दिला जाणार आहे. एक तासापेक्षा अधिक वेळ बाजारपेठेत थांबल्यास एक हजार रुपये दंड केला जाणार आहे. शहरातील मुख्य बाजारपेठा बॅरिकेड्सच्या सहाय्याने सील करण्यात येत आहेत. मात्र, मंगळवारी पहिल्याच दिवशी निर्बंधाचा फज्जा उडाला. पोलिसांनी मेनरोडवर एन्ट्री पॉईटला बॅरेकेटिंग केलेले दिसून आले पण घटनास्थळी ना पोलीस होते, ना पास देण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी होते. त्यामुळे ग्राहकांसह बेशिस्त नागरिकांनी मेनरोडवर वाहनांसह मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचं दिसून आले. अनेक ग्राहक कुटुंबियांसह खरेदीसाठी बाजारपेठेत आले होते. सुरुवातीला अनेकजण पास कोठे मिळतो, याबाबत विचारणा करताना दिसून आले. मात्र, अनेकांना आम्हालाही पास वितरण कोठे केले जात आहे, हे माहिती असे सांगितले. तसेच बाजारपेठांमध्ये प्रवेशाच्या ठिकाणे बॅरिकेट्स दिसले पण पोलीस उभे नसल्याने अनेकजण दुचाकी, चारचाकी वाहनांसह जाताना दिसून आले.

भद्रकाली पोलीस ठाणे हदीतील बाजारपेठाकडे जाणार्‍या एन्ट्री पॉईट बॅरिकेट्सने सील केल्या असून, पोलीस तैनात करण्यात आले आहेत. महापालिकेकडे पास नवीन नियमावलीनुसार नसल्याने पहिल्या दिवशी वितरीत झाले नाही. बुधवारपासून कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. नागरिकांनी बाजारपेठेमध्ये गर्दी करु नये.
                                                                – साजन सोनवणे,वरिष्ठ पोलीस निरीक्षक

सरकारवाडा पोलीस ठाणेहदीत पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. महापालिकेने पासची तयारी पूर्ण केल्यानंतर तत्काळ नागरिकांना पास वितरीत केले जाणार आहे. त्यानंतर बाजारपेठांमध्ये एन्ट्री पॉईंट आणि एक्झिट पॉईट ठिकाणी पास दाखवल्यानंतरच नागरिकांना प्रवेश दिला जाईल.
                  – हेमंत सोमवंशी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सरकारवाडा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -