घरक्राइमबापाने घेतला पोटच्या पोरांचा जीव, आईस्क्रीममधून दिलं ३ मुलांना उंदराचं औषध

बापाने घेतला पोटच्या पोरांचा जीव, आईस्क्रीममधून दिलं ३ मुलांना उंदराचं औषध

Subscribe

५ वर्षांच्या मुलाचा विषामुळे दुर्दैवी मृत्यू

घरात होणाऱ्या वादांचा घरातील लहान मुलांवर विपरीत परिणाम होतो. मात्र इथे कौटुंबिक वाद लहान चिमुकल्यांच्या जिवावर बेतला आहे. बाप आणि मुलांच्या नात्याला काळीमा फासणारी घटना मुंबईच्या मानखुर्द येथे घडली आहे. वडील म्हणजे मुलांसाठी कणखर पाठिंबा असतो. मात्र इथे वडिलच मुलांसाठी त्यांच्या मृत्यूचे कारण बनले आहे. मानखुर्द येथे वडिलांनी आपल्या पोटच्या तीन मुलांना आईस्क्रिममधून उंदराचं औषध खाऊ घालून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. मुलांच्या आईने आपल्या नवऱ्याविरुद्ध मानखुर्द पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.  तीन मुलांचे वय सात वर्षे, पाच आणि दोन वर्षे होती. त्यातील ५ वर्षांच्या मुलाचा विषामुळे दुर्दैवी मृत्यू झालाय. तर दोन मुलांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ( Father gives rat medicine to his 3 children through ice cream in mankhurd mumbai)

मोहम्मद अली असे मुलांच्या खुनी वडिलांचे नाव आहे. मोहम्मद यांच्या घरात रोज काहीना काही कारणामुळे वाद होत असत. याच वादातून रागाच्या भरात त्यांनी आपल्या तीन लहान मुलांचा जीव घेतला. घरगुती वादाला कंटाळून मोहम्मद अली यांनी उंदाचे औषध खरेदी करुन आईस्क्रिममधून आपल्या मुलांना खाऊ घातले. आईस्क्रिम खाल्ल्यानंतर तीन्ही मुले जागीच कोसळली. त्यातील पाच वर्षांच्या अलिशान अन्सारी याचा मृत्यू झाला. सात वर्षांची अलिना आणि दोन वर्षांचा अरमान यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. दोघेही मृत्यूशी झुंज देत आहे.

- Advertisement -

आपल्या मुलांचा जीव घेऊन निर्दयी बाप मात्र अद्याप फरार आहे. मोहम्मद अली यांच्या पत्नीच्या तक्रारीनंतर पोलीस फरार झालेल्या मोहम्मद अली यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस फरार मोहम्मद अलीचा शोध घेत आहेत.

 

- Advertisement -

हेही वाचा – दहिसरमध्ये भरदिवसा ज्वेलर्सच दुकान लुटून मालकाची हत्या

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -