Amul milk price hike: अमूल दूध महागले! उद्यापासून ग्राहकांना लीटरसाठी इतके पैसे ज्यादा मोजावे लागणार

Milk to get expensive as Amul hikes price by Rs 2 per litre
Amul दूध महागले! उद्यापासून ग्राहकांना लीटरसाठी इतके पैसे ज्यादा मोजावे लागणार

कोरोना काळात महागाईमुळे लोकं त्रस्त झाले आहेत. खाद्यपदार्थांपासून ते पेट्रोल आणि डिझेलपर्यंत सर्व काही महागले आहे. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होत आहे. आता अमूलने (Amul Milk) ग्राहकांना झटका दिला आहे. अमूल दूधाचे दर वाढवण्यात (Amul milk price hike) आले आहे. गुजरात सहकारी दूध विपणन महासंघ (GCMMF)ने बुधवारी अमूल दूधाची किंमत १ जुलैपासून सर्व ब्रँडमध्ये २ रुपयांनी वाढविण्यात येणार आहे, असे जाहीर केले.

अमूलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, जवळपास एक वर्ष आणि सात महिन्यांच्या अंतरानंतर किंमतीत वाढ केली आहे. उत्पादन खर्चात वाढ झाल्याने किंमती वाढविणे आवश्यक झाले होते.

अमूल ब्रँडचे दूध आणि डेअरी उत्पादनाचे विपणन करणारे जीसीएमएमएफ व्यवस्थापकीय संचालक आरएस सोढी म्हणाले की, उद्यापासून संपूर्ण भारतात अमूल दूधाची किंमत २ रुपये प्रति लीटरने वाढवली जाईल. नवीन किंमत सर्व अमूल दूध ब्रँड म्हणजेच गोल्ड, ताजा, शक्ती, टी-स्पेशल तसेच गायीचे आणि म्हशीचे दूध यासर्वांवर लागू होणार आहे.

सोढी पुढे म्हणाले की, खाद्यपदार्थांच्या महागाईमुळे दूधाची किंमत वाढविणे आवश्यक झाले होते. या व्यतिरिक्त पॅकेजिंग खर्चामध्ये ३० ते ४० टक्के, वाहतूक खर्चात ३० टक्के आणि ऊर्जी खर्चात ३० टक्के वाढ झाली आहे. यामुळे इनपूट खर्च वाढला आहे.

आता अमूल दूधाची किंमत वाढल्याने १ जुलै म्हणजेच उद्यापासून ग्राहकांना अमूलच्या फूल क्रीम दूधासाठी एक लीटर पॅकला ५७ रुपये द्यावे लागणार आहे. तर ग्राहकांनी फूल क्रीम दूधाच्या अर्ध्या लीटरच्या पॅकला २९ रुपये द्यावे लागणार आहे.


हेही वाचा – आंतरराष्ट्रीय विमानसेवा आता ३१ जुलैपर्यंत राहणार स्थगित, DGCAचा आदेश