घरमहाराष्ट्रनाशिकयूक्रेनहून परतलेल्या विद्यार्थ्यांना मिळणार ऑनलाईन शिक्षण

यूक्रेनहून परतलेल्या विद्यार्थ्यांना मिळणार ऑनलाईन शिक्षण

Subscribe

वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते आज उद्घाटन

नाशिक : युक्रेनमधील युध्दजन्य परिस्थितीमुळे भारतात परतलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन वैद्यकीय शिक्षण देण्याचा निर्णय महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने घेतला आहे. तीन महिन्यांच्या या अभ्यासक्रमाचा शुभारंभ वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते गुरुवारी (दि.7) दुपारी 11 वाजता ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणार आहे.

https://youtu.be/JNTDGymeRQM या लिंकवर हा अभ्यासक्रम उपलब्ध करुन दिला जाणार आहे. या कार्यक्रमास विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर, प्रति-कुलगुरू डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण उपस्थित राहणार आहेत. युद्धामुळे वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी विद्यापीठ व इल्सेविअर या संस्थेच्या विद्यमाने डिजिटल कटेंन्ट तयार केला आहे.

- Advertisement -

या माध्यमातून ऐच्छिक व ऑनलाईन स्वरुपाचे शिक्षण विद्यार्थी घेऊ शकतात. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, असे कुलगुरुंनी सांगितले. आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाकडून MUHS App तयार करण्यात आले आहे. सर्वच क्षेत्रात डिजिटल उपकरणे मोठ्या प्रमाणात वापरण्यात येत आहेत. शैक्षणिक क्षेत्रात तसेच विद्यापीठातर्फे घडणार्‍या घडामोडी विद्यार्थी, शिक्षक, पालक व अभ्यागतांना स्मार्ट मोबाईल फोनवर उपलब्ध व्हाव्यात यासाठी हे अ‍ॅप तयार करण्यात आले आहे.

ऑनलाईन शिक्षणासाठी नोंदणी आवश्यक

ऑनलाईन शिक्षणासाठी विद्यापीठाच्या www.muhs.ac.in या संकेतस्थळावर विद्यार्थी नोंदणी करू शकतील. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना डिजिटल कंटेंन्ट निःशुल्क उपलब्ध होणार आहे. ऑनलाईन शिक्षणाचा विद्यार्थ्यांना भविष्यात परीक्षा, नोंदणी, अध्ययन पूर्ण केल्याबाबतचा कोणताही हक्क प्राप्त होणार नाही अथवा सांगता येणार नाही, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावे. काही अडचणी आल्यास इल्सेविअरचे अधिकारी अमित मोदी, अंकुश रॉय, रविराज शिंगारे, राहूल सिंह मार्गदर्शन करणार आहेत.

- Advertisement -

 

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -