घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्र'शासन आपल्या दारी'ची जय्यत तयारी; ५०० बसेस, २० हजार लाभार्थी, ८ नोडल...

‘शासन आपल्या दारी’ची जय्यत तयारी; ५०० बसेस, २० हजार लाभार्थी, ८ नोडल अधिकारी नियुक्त

Subscribe

नाशिक : शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळावा, तसेच या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचाव्यात या उददेशाने शासन आपल्या दारी हा उपक्रम घेतला जात आहे. नाशिक येथे १५ जुलै रोजी या उपक्रमांतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून प्रशासकीय पातळीवर या कायर्र्क्रमासाठी तयारीची लगबग सुरू झाली आहे. पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेत मंगळवारी आढावा कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी आढावा बैठक घेण्यात आली. या कार्यक्रमासाठी सुमारे २० हजार लाभार्थी उपस्थित राहणार असून लाभार्थ्यांना आणण्यासाठी पाचशे बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच नियोजनासाठी ८ नोडल अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात येऊन कामाच्या जबादारयांचे वाटप करण्यात आले आहे.

गंगापूर रोडवरील डोंगरे वसतीगृह मैदान येथे शनिवार (दि.१५) रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ, पालकमंत्री गिरीश महाजन, केंद्रिय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यासह आमदार उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या पार्श्वभुमीवर पालकमंत्री दादा भुसे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत प्रत्येक विभागाचा आढावा घेतला. कार्यक्रमाच्या ठिकाणी नागरिक व लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी १०० विविध स्टॉल्स लावण्यात येणार आहे. जिल्हयात शासनाच्या विविध योजनांचे ८ लाख लाभार्थी असून सुमारे २५ हजार लाभार्थ्यांना कार्यक्रम स्थळी आणण्याचे नियोजन करण्यात येत आहे. याकरीता एसटी महामंडळाच्या पाचशे बसेसचेही नियोजन करण्यात आले आहे.

- Advertisement -

या बैठकीनंतर पालकमंत्री दादाजी भुसे यांनी डोंगरे वसतीगृह मैदान या कार्यक्रमस्थळाची पाहणी केली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रमुख अधिकार्‍यांशी कार्यक्रमासाठी तयार करण्यात येणारी मंडप व्यवस्था, विविध शासकीय कार्यालयांचे स्टॉल्स, लाभार्थ्यांच्या आसन व्यवस्था याबाबत चर्चा केली. यावेळी खासदार हेमंत गोडसे, आमदार देवयानी फरांदे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुधंती शर्मा, कार्यकारी अभियंता उदय पालवे, उपजिल्हाधिकारी नितीनकुमार मुंडावरे, भिमराज दराडे, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांच्यासह पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

अशी आहे व्यवस्था

दरम्यान कार्यक्रमासाठी लाभाथ्यांची ने-आण करण्यासाठी एसटी महामंडळाच्या ३०० बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. या सर्व बसेस या चोपडा लॉन्स जवळील श्रध्दा लॉन्स तसेच इदगाह मैदानावर उभ्या करण्यात येणार आहे. तसेच नाशिक शहर व तालुक्यातील लाभार्थ्यांना कार्यक्रमस्थळी आणण्यासाठी दिडशे बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. लाभार्थ्यांची गैरसोय होऊ नये याकरीता त्यांना वाहनातच अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात येणार आहे तसेच कार्यक्रम संपल्यानंतर त्यांना फुड पॅकेटस, पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने सहभागींची त्रेधातिरपीट उडू नये म्हणून वॉटरप्रूफ टेन्टची उभारणी करण्यात येत आहे.

- Advertisement -

प्रातिनिधीक स्वरूपात १० लाभार्थ्यांचा सत्कार

लाभार्थ्यांची संख्या जरी मोठी असली तरी, मुख्यमंत्रयांच्या वेळेचे नियोजन बघता प्रातिनिधीक स्वरूपात १० ते १५ लाभार्थ्यांना शासनाच्या योजनांच्या वाटप मंत्री महोदयांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या कार्यक्रमात केवळ दाखले वाटप न करता घरकुल योजना, शेती अवजारे वाटप, एमएसएमई अंतर्गत नवउद्योजकांना धनादेश वाटप करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

असे आहे नियोजन

  • १५००० स्के फुट जागेवर मंडप उभारणी
  • व्यापीठाची उंची ८ फुट
  • व्यासपीठावर ८० मान्यवरांच्या बसण्याची व्यवस्था
  • मंडपात २५ एल.डी.डी स्क्रिनचीव्यवस्था
  • व्यासपीठाच्या दोन्ही बाजूला विविध योजनांची माहिती देणारे १०० स्टॉल्स
  • रोजगार मेळावा, आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन.
  • २० हजार लाभार्थ्यांची राहणार उपस्थिती.
  • प्रत्येक तालुका, गावासाठी समन्वयकाची नियुक्ती
  • नाशिक शहरातील ८ हजार लाभार्थ्यांची निवड
  • सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन.
  • सिटी लिंकच्य १५० बसेस करणार अधिग्रहीत.
  • कार्यक्रमस्थळी वाहतूक मार्गात करणार बदल
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -