घरमहाराष्ट्रनाशिक'शासन आपल्या दारी'त राजी-नाराजी? नियोजन बैठकीला राष्ट्रवादीच्या आमदारांची अनुपस्थिती

‘शासन आपल्या दारी’त राजी-नाराजी? नियोजन बैठकीला राष्ट्रवादीच्या आमदारांची अनुपस्थिती

Subscribe

नाशिक : राष्ट्रवादीचा एक गट सत्तेत सहभागी झाल्याने नाशिक जिल्हयातील सर्वच आमदार आता सत्ताधारी गटाचा झाला आहे. राज्यस्तरावर तीन पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांशी जुळवून घेतले असले तरी, स्थानिक स्तरावर मात्र आमदारांमध्ये एकमत होत नसल्याचेच दिसून येते याचाच पहिला अंक पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेत नियोजन भवन येथे शासन आपल्या दारी उपक्रमाच्या तयारीच्या पार्श्वभुमीवर आयोजीत बैठकीत दिसून आला. राष्ट्रवादीच्या आमदारांनी या बैठकीकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले.

नाशिकमध्ये शनिवार (दि.१५) रोजी शासन आपल्या दारी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ या माध्यमातून देण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शिंदे भाजपसोबत हातमिळवणी केल्याने आता राज्यात तीन पक्षांचे सरकार सत्तेत आहे. अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर गडचिरोली येथे आयोजित शासन आपल्या दारी कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे, फडणवीस, पवार म्हणजे विकासाचे त्रिशुळ असल्याचे सांगितले. दोन दिवसांपूर्वीच धुळे येथे आयोजित कार्यक्रमात शिवसेना, भाजपचे झेंडे लावण्यात आले होते पण राष्ट्रवादीचा ध्वज नसल्याने त्यांनी आपल्या भाषणात आता तीन पक्षांचे सरकार आहे राष्ट्रवादीचेही झेंडे लावा असा खोचक टोलाही लगावला.

- Advertisement -

मंत्रीमंडळाचा विस्तार होउनही अद्याप खातेवाटप झालेले नाही. राष्ट्रवादीला काही खाती देण्यास शिंदे गटाचा विरोध असल्याचेही बोलले जाते. त्यामुळे कुठेतरी सरकारमध्ये सहभागावरून राष्ट्रवादी शिवसेनेत कुठेतरी नाराजी असल्याचे बोलले जाते. या नाराजीचे पडसाद स्थानिक स्तरावरही पडत असल्याचे दिसून येते. मंगळवारी नाशिकमध्ये पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत आयोजीत बैठकीकडे राष्ट्रवादीच्या आमदार गैरहजर होते यावरूनच सत्ताधार्‍यांमध्ये कुठेतरी अंतर्गत नाराजी असल्याचे दिसून आले. या नाराजीबाबत विचारले असता कार्यक्रमात राष्ट्रवादीचेही झेंडे लागतील असे पालकमंत्री भुसे यांनी सांगितले.

सोमवारी धुळे येथे शासन आपल्या दारी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र खराब हवामानामुळे मुख्यमंत्र्यांना कार्यक्रमस्थळी पोहचण्यास उशीर झाला. त्यामुळे सोमवारी नाशिकमध्ये सायंकाळी नियोजीत बैठक ही ऐनवेळी रदद करावी लागली. ही बैठक मंगळवारी घेण्याचे ठरले त्यामुळे कदाचित आमदारांना उपस्थित राहता आले नसेल मात्र कुठल्याही प्रकारची नाराजी नाही. : दादा भुसे, पालकमंत्री

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -