घरमहाराष्ट्रनाशिकदिवाळी गिफ्टसाठी मिठाई, चॉकलेटचा गोड पर्याय

दिवाळी गिफ्टसाठी मिठाई, चॉकलेटचा गोड पर्याय

Subscribe

ग्राहकांची स्वादिष्ट ड्रायफूट मिठाईला सर्वाधिक पसंती

नाशिक : दिवाळी अवघ्या पाच दिवसांवर आली असून, फराळ व मिठाईची मागणी वाढली आहे. ग्राहकांसाठी उत्कृष्ट दर्जाचे मिठाई पॅक खरेदी करता यावेत, यासाठी नाशिक शहरातील मिठाईच्या दुकानांमध्ये हायजेनिक पद्धतीने तयार केलेले विविध आकारातील सुंदर आणि सुबक मिठाईची पाकिटे विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. यामध्ये पिस्ता, ऑरेंज, पायनापल, गुलकंद, बेसनाचे लाडू, गुलाबजाम, काजूकतली, चॉकलेट्स, ड्रायफ्रूट मिठाईचा समावेश आहे. ग्राहकांची स्वादिष्ट ड्रायफूट मिठाईला सर्वाधिक पसंती मिळत आहे. विशेष म्हणजे, दिवाळीला गिफ्ट करण्यासाठी मिठाई हा सर्वोत्तम पर्याय असल्यामुळे ग्राहकांना नातेवाईक आणि आप्तेष्टांना गिफ्ट करण्यासाठी चिमुकल्यांपासून ज्येष्ठांपर्यंतच्या आवडीनुसार मिठाई तयार करण्यात आली असल्याचे दिसून येत आहे. परिणामी, मिठाई दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी आता वाढू लागली आहे.

दिवाळीत मिठाईची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. ग्राहकांची पावले मिठाई दुकानांकडे वळू लागल्याने दुकानदारांनीसुद्धा आकर्षक मिठाई तितक्याच आकर्षकपणे मांडून विक्रीसाठी उपलब्ध करून दिली आहे. गतवर्षी कोरोनामुळे निर्बंध असल्याने मिठाई दुकानात ग्राहकांची तुरळक गर्दी होती. परिणामी, मिठाई विक्रीचा गोडवा हरवला होता. यंदा कोरोना ओसरल्याने निर्बंध शिथील केल्यामुळे दिवाळी उत्साही, आनंदी आणि कोरोनामुक्त वातावरणात साजरी करता यावी, यासाठी ग्राहक मिठाई दुकानात गर्दी करु लागले आहेत.

- Advertisement -

शहरातील विविध मिठाई दुकानांमध्ये विविध प्रकारच्या मिठाई विक्रीस उपलब्ध आहेत. मात्र, यंदा तेल, सुका मेवा, सिलेंडरची दरवाढ झाल्यामुळे मिठाईच्या दरात सुमारे १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, आता ग्राहकांना ती मिठाई केव्हापर्यंत खाता येईल, यासंबंधी सूचना देणारी तारीख म्हणजे बेस्ट बिफोर ही मिठाईच्या ट्रेसमोर लिहीणे बंधनकारक करण्यात आले आहे. अन्न सुरक्षा व मानस प्राधिकारी, नवी दिल्ली यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे मिठाईवर बेस्ट बिफोरचे लेबल लावण्यात आले आल्याने ग्राहकांना मनसोक्त मिठाई खाता येणार आहे.

- Advertisement -

शुगर फ्री मिठाई

ज्येष्ठ नागरिकांना गोड खाण्यावर मर्यादा असली तरी त्यांना हायजेनिक पद्धतीने तयार केलेली शुगर फ्री मिठाई खाता यावी, यासाठी विक्रेत्यांनी पुढाकार घेतला आहे. विक्रेत्यांनी ग्राहकांसाठी शुगर फ्री मिठाई, शुगर फ्री किवी, शुगर फ्री चॉकलेटही विक्रीसाठी ठेवले आहेत. त्यामुळे ज्येष्ठांची पावलेसुद्धा मिठाई दुकानांकडे वळू लागली आहेत.

आमच्याकडे हायजेनिक पध्दतीने तयार केलेले बेस्ट क्वालिटीच्या स्वादिष्ट मिठाई विक्रीस उपलब्ध आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी शुगर फ्री मिठाईसुद्धा उपलब्ध आहे. मिठाईच्या विविध व्हराईटीजसुद्धा आहेत. यंदा महागाईमुळे दरात १५ टक्के वाढ केली आहे. ग्राहकांची मिक्स मिठाईला सर्वाधिक पसंती आहे.
                                            – रतन चौधरी (संचालक), सागर स्वीट्स

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -