घरमहाराष्ट्रनाशिकमनसे कार्यकर्त्यांच्या बैठकीत मध्य नाशिकबाबत चाचपणी

मनसे कार्यकर्त्यांच्या बैठकीत मध्य नाशिकबाबत चाचपणी

Subscribe

नाशिक : नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बुधवारी (दि.२५) राजगड येथे बैठक झाली. या बैठकीत माजी आमदार नितीन भोसले यांनी मध्य विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागण्याचे आवाहन केले. मागील निवडणुकीत मनसे येथे दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष असल्याने कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन मनसे व राज ठाकरे यांची भूमिका सांगण्याचेही आवाहन करण्यात आले. माजी आमदार नितीन भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी (दि.२५) मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते व पदाधिकारी यांची बैंठक घेण्यात आली. या मतदारसंघातून मनसेतर्फे माजी आमदार नितीन भोसले इच्छुक आहेत. यामुळे त्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करून मतदारसंघातील पक्षाच्या स्थितीचा आढावाा घेतला.

सध्याच्या सरकारच्या कारभाराला राज्यातील जनता कंटाळली असल्याने मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे विचार घरोघरी पोचवण्याचे आवाहन त्यांनी केले.अहवाल राज ठाकरे यांच्याकडेविधानसभा निवडणुकीसाठी नाशिक जिल्ह्यातून मनसेकडून इच्छुकांच्या मुलाखती घेतल्यानंतर प्रदेश सरटिणीस संदीप देशपांडे व अभिजित पानसे यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांना अहवाल सादर केला असल्याचे समजते. त्यानंतर नाशिकमधील पदाधिकार्‍यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -