घरमहाराष्ट्रनाशिकनाशिक जिल्हा परिषदेचे मुख्यालय बनले कचरा, भंगाराचे आगार

नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्यालय बनले कचरा, भंगाराचे आगार

Subscribe

नाशिक : जिल्हा परिषदेच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या मजल्यावर ठेवण्यात आलेल्या कचर्‍याच्या गोण्या आणि भंगार सामान यामुळे तोंड दाबुन चालण्याची वेळ आली आहे. याबाबत कामानिमित्त येथील बांधकाम, स्वच्छता पाणी पुरवठा, शिक्षण विभागात आलेल्या जिल्हावासियांनी माय महानगरकडे तक्रार केली.

या तक्रारीबाबत दैनिक आपलं महानगरने सत्यता तपासली असता जिल्हा परिषदेत कचर्‍याची अन भंगार वस्तुंची साठवण मोठ्या प्रमाणावर केली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. दुसर्‍या मजल्यावर सार्वजनिक बांधकाम विभागात प्रवेश करतांना पहिल्या प्रवेशद्वाराजवळील बाथरुमजवळ साठवून ठेवलेला कचरा, काचा, कपाटामागील घाण अन् कचरा यामुळे नाक दाबुन चालण्याची वेळ आली आहे. तर तिसर्‍या मजल्यावरील प्रवेशद्वाराजवळ ठेवलेल्या कचर्‍याच्या गोण्यांमुळे आपण जिल्हा परिषदेत आलो की कचर्‍याच्या आगारात असा प्रश्न पडतो. संपूर्ण जिल्ह्याच्या आरोग्याची, सामाजिक प्रश्नांची, पर्यावरणाची काळजी घेणारी जिल्हा परिषद मात्र आजारी असल्याचे पाहणीत निष्पन्न झाले आहे. यामुळे करोडो रुपयांच्या योजना राबविणारी जिल्हा परिषद मात्र स्वत:ला स्वच्छ राखण्यात अपयशी ठरली आहे.

- Advertisement -

या तुलनेत नाशिक महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, विभागीय आयुक्त कार्यालय यांची स्वच्छता आणि नीटनेटकेपणा वाखाणण्याजोगा आहे जिल्हा परिषद या तुलनेत अपयशी ठरते. जिल्ह्याच्या आरोग्याची, शिक्षणाची सोय करणारे जिल्हा परिषदेचे अधिकारी मात्र हा कचरा अन भंगार सामान हटविण्याकडे सोईस्कररित्या दुर्लक्ष करतात हे दुर्देव. एकीकडे 47 लाख रुपये खर्च करुन जिल्हा परिषदेची डागडुजी अन रंगरंगोटी करण्याचे काम सुरु आहे. तर दुसरीकडे कचरा आणि भंगार सामानाची साठवणुक यामुळे जिल्हा परिषद कचर्‍याचे आगार झाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -