घरताज्या घडामोडीपुढील शैक्षणिक वर्ष जुलैऐवजी सप्टेंबरपासून?

पुढील शैक्षणिक वर्ष जुलैऐवजी सप्टेंबरपासून?

Subscribe

विद्यापीठ अनुदान आयोगाने नियुक्त केलेल्या समितीची शिफारस

नाशिक : करोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता विद्यापीठ आणि उच्च शैक्षणिक संस्थांमधील शैक्षणिक सत्र येत्या जुलैऐवजी सप्टेंबरपासून सुरू करता येईल, अशी शिफारस विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) नियुक्त केलेल्या समितीने केली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी व ऑनलाईन शिक्षणाच्या समस्यांकडे लक्ष देण्यासाठी यूजीसीने दोन समित्यांची स्थापना केली होती.
हरियाणा विद्यापीठाचे कुलगुरू आर. सी. कुहाड यांच्या अध्यक्षतेखालील एक समिती स्थापन केली आहे. त्यामध्ये विद्यापीठांमध्ये परीक्षा घेण्याच्या मार्गांचा विचार केला जाईल आणि पर्यायी शैक्षणिक वर्ष सुरु करण्याची शिफारस केली जाणार आहे.  ऑनलाईन शिक्षणामध्ये सुधारणा करण्याच्या उपाययोजना सुचविणाशिवाय शैक्षणिक वर्ष जुलैएवजी सप्टेंबर 2020 पासून करण्याची शिफारस केली आहे. दुसर्‍या समितीचे नेतृत्व इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (इग्नू) कुलगुरु नागेश्वर राव यांनी केले. शुक्रवारी (दि.24) दोन्ही पॅनेलने आपले अहवाल सादर केले. जुलै महिन्यापेक्षा सप्टेंबरपासून शैक्षणिक सत्र सुरू करण्याची शिफारस केली आहे. दुसर्‍या पॅनेलने असे सुचवले आहे की, विद्यापीठांकडे पायाभूत सुविधा व साधन असल्यास त्या ऑनलाईन परीक्षा घ्याव्यात किंवा लॉकडाउन संपण्याची प्रतीक्षा करावी आणि नंतर परीक्षेची तारीख ठरवावी. केंद्र सरकारतर्फे दोन्ही अहवालांचा अभ्यास केला जाणार असून पुढील आठवड्यात याविषयी अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -