घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रसहा दिवसीय मुलीचा मृत्यू कोरोना नव्हे तर जंतूसंसर्गाने

सहा दिवसीय मुलीचा मृत्यू कोरोना नव्हे तर जंतूसंसर्गाने

Subscribe

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांचे स्पष्टीकरण

पालघर येथील जन्मलेल्या सहा दिवसीय मुलीचा नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या मुलीचे जन्मत:च वजन कमी असल्याने आणि तिला जंतूसंसर्ग झाल्याने मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी दिली. या चिमुकलीचा कोरोनाने मृत्यू झाल्याची चर्चा राज्यात होती. मात्र, मुलीसह आईचा कोरोना अहवाल निगेटिव्ह असल्याचे डॉ. थोरात यांनी सांगितले.

पालघर जिल्ह्यातील दरशेत येथील अश्विनी काटेला यांनी ३१ मे रोजी एका मुलीस जन्म दिला होता. मात्र, जन्मलेल्या मुलीचे वजन कमी भरले. खासगी रुग्णालयात मुलीची चाचणी केली असता तिचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्याबाबत कोणतेही कागदपत्र नव्हते. दरम्यान, मुलीची तब्येत खालावल्याने तिला जव्हार येथील शासकीय रुग्णालय व तेथून २ जूनला नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुलीच्या फुफ्फुसाची वाढ न झाल्याने आणि तिला श्वास घेण्यास त्रास होत होता व अंतर्गत रक्तस्त्राव झाला होता. तसेच जंतुसंसर्ग झाल्याने तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. नाशिकला चिमुकलीसह आईची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. त्यात दोघांचेही अहवाल निगेटिव्ह आले. रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञांनी शर्थीचे प्रयत्न केल्यानंतरही चिमुकलीचा जीव वाचवता आला नाही. अवयवांची वाढ न झाल्याने, अंतग्रत रक्तस्त्राव व श्वास घेण्यास अडचण येत असल्याने चिमुकलीचा मृत्यू झाल्याचे डॉ. थोरात यांनी सांगितले. त्यामुळे कोरोनामुळे या चिमुकलीचा मृत्यू झाल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -