घरमहाराष्ट्रनाशिकसमसमान मत पडली आणि पुढे....

समसमान मत पडली आणि पुढे….

Subscribe

नाशिक : राज्यातील ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींसाठी १८ डिसेंबरला मतदान पार पडले होते. त्यानंतर आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर १२ वाजेच्या सुमारास निकाल जाहीर झाले. नाशिक जिल्ह्यातही १९६ ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडले. नाशिक तालुक्यातील ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर झाला असून अनेक ठिकाणी अटीतटीचा सामना रंगल्याच दिसून आल. नाशिक तालुक्यातील एकलहरे ग्रामपंचायची निवडणूक दिग्गज चेहर्‍यांमुळे लक्षवेधी ठरली होती. त्यातच तेथे दोन उमेदवारांना समसमान मते पडल्याने अखेर ईश्वर चिठ्ठीने विजयी उमेदवार ठरवण्यात आला.

एकलहरे ग्रामपंचायतीत शिवसेनेचा ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात थेट सामना होता. ग्रामविकास पॅनल आणि परिवर्तन पॅनल असा हा दुरंगी सामना होता. यातच सदस्य पदाच्या निवडणुकीत ग्रामविकास पॅनलचे सचिन होलिन आणि परिवर्तन पॅनलचे सागर बारमाटे यांना समसमान २३० मते पडली. यानंतर एका लहान मुलाच्या हातून ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली. यात ग्रामविकासचे सचिन होलिन यांच्या नावाची चिठ्ठी निघाल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले.

- Advertisement -

दरम्यान, तालुक्यातील महत्वाची समजल्या जाणार्‍या बेलगाव ढगा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सविता शरद मांडे यांची निवड झाली असून त्यांना ७११ मते मिळाली. तर सदस्यपदी गुंबाडे भीमा दत्तू, गांगुर्डे किशोर भानुदास, गांगुर्डे वंदना बाळासाहेब, बेंडकुळे सीमा छगन, निंबेकर लक्ष्मी पुनाजी या निवडून आल्या आहेत. तसेच, लाडची ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रेखा सुनील कडाळी यांची निवड झाली असून त्यांनी दुसर्‍यांदा लोकनियुक्त सरपंच होण्याचा मान मिळवला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -