घरमहाराष्ट्रनाशिकशनिवारी नाशिक शहरात पाणी-बाणी

शनिवारी नाशिक शहरात पाणी-बाणी

Subscribe

नाशिक : एकीकडे शहरावर पाणी कपातीचे ढग दाटून आले असताना शनिवारी महावितरणच्या शटडाऊनमुळे संपूर्ण दिवसभर पाणी बंद करण्याचा निर्णय महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने घेतला आहे. दरम्यान, अल निनोच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पाणी कपातीचा निर्णय लागू करण्यासाठी टोलवाटोलवी सुरूच असताना आता महावितरणकडून अप्रत्यक्षपणे कपातीसाठी मदत होत असल्याचे चित्र आहे.

नाशिक महापालिकेचे गंगापूर धरण पंपींग स्टेशन येथे महावितरण कंपनीकडील १३२ केव्ही सातपूर व महिंद्रा या दोन फिडरवरुन ३३ केव्ही एचटी वीज पुरवठा घेण्यात आलेला आहे. सदर पंपींग स्टेशनद्वारे बारा बंगला, शिवाजीनगर, पंचवटी, निलगिरी बाग, गांधीनगर व नाशिकरोड जलशुध्दीकरण केंद्र यांना रॉ वॉटरचा पुरवठा करणेत येतो. महावितरण कंपनीकडून सातपूर कॉलनी ते कार्बन नाका ते गंगापूर धरण पर्यंत ओव्हरहेड लाईनची दुरुस्ती व पावसाळा पूर्व कामे करण्याकरीता तसेच महापालिकेचे मुकणे रॉ वॉटर पंपींग स्टेशन येथे महावितरण कंपनीकडील रेमण्ड कार्यान्वित सबस्टेशन गोंदे येथून एक्सप्रेस फिडरवरुन जॅकवेलसाठी ३३ केव्ही वीजपुरवठा आहे. सदरचे महावितरण कंपनीच्या रेमण्ड सबस्टेशनमध्ये दुरुस्ती कामे करावयाची असल्याने शनिवार दि. २९ रोजी वीजपुरवठा बंद राहणार आहे. तसेच रविवार दि. ३० रोजी सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने कमी प्रमाणात होईल तरी नागरिकांनी याची नोंद घेऊन महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.

- Advertisement -

आठवड्यातून 2 वेळा पाणी कपात

जून व जुलै महिन्यात यंदा पाऊस येण्याची शक्यता कमी आहे. अल निनो हे त्याचे कारण असल्यामुळे राज्य शासनाच्या सूचनेनुसार पालिकेने एप्रिल व मे महिन्यात आठवड्यातून एक दिवस तर पुढे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आढावा घेऊन जून व जुलै महिन्यात आठवड्यातून दोन वेळेस पाणी कपातीचे नियोजन केले आहे. मात्र, यासंदर्भात निर्णय कोणी घ्यायचा या सर्वात एप्रिल महिना गेला आहे. निर्णय कधी होईल हे अस्पष्ट असताना शनिवारचा दिवस महावितरणमुळे कोरडा ठेवण्याची वेळ आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -