घरमहाराष्ट्रनाशिकमहिलांनी साधला उत्स्फूर्त संवाद !

महिलांनी साधला उत्स्फूर्त संवाद !

Subscribe

मानसिक शारिरिक आरोग्याबाबतचे मार्गदर्शन ऐकल्यानंतर तज्ज्ञ आणि उपस्थित महिलांमध्ये खुले संवाद सत्र रंगले. यावेळी महिलांकडून आलेल्या आहार व्यवस्थापन, शारीरिक बदल, मॅनोपॉज येण्यापूर्वीची स्थिती, नंतरची काळजी, मासिक पाळी, स्वच्छता, व्यायाम आदी अनेक प्रश्नांना तज्ज्ञांनी सविस्तर उत्तरे दिली.

मानसिक शारिरिक आरोग्याबाबतचे मार्गदर्शन ऐकल्यानंतर तज्ज्ञ आणि उपस्थित महिलांमध्ये खुले संवाद सत्र रंगले. यावेळी महिलांकडून आलेल्या आहार व्यवस्थापन, शारीरिक बदल, मॅनोपॉज येण्यापूर्वीची स्थिती, नंतरची काळजी, मासिक पाळी, स्वच्छता, व्यायाम आदी अनेक प्रश्नांना तज्ज्ञांनी सविस्तर उत्तरे दिली.

दैनिक ‘आपलं महानगर’ आणि एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरच्या वतीने महिला दिनी अर्थात शुक्रवारी, ८ मार्चला आयोजित या कार्यक्रमात ‘आपलं महानगर’चे मुख्य संपादक संजय सावंत यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, आई, पत्नी, मुलगी या नात्यांतून घरात रोज घरात स्त्रीचं महत्वं अधोरेखीत होत असतं. ‘स्त्री’ ही प्रत्येकवेळी स्वत:पेक्षा नेहमीच कुटुंबांचा विचार करते. ती इतरांच्याच हिताची काळजी वाहते. कुटुंबाचा गाडा चालण्यासाठी तीचे स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. महिलांच्या आरोग्यावर सविस्तर चर्चा होण्याचा उद्देश ठेवून ‘आपलं महानगर’ने तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचा कार्यक्रम ठेवला आहे. ‘आपलं महानगर’चे नाशिक आवृत्तीचे निवासी संपादक मिलिंद सजगुरे आभार मानले. यापुढील काळात ‘आपलं महानगर’मार्फत दरवर्षी ८ मार्चला महिलादिनाचा उत्सव साजरा करण्यात येईल, असेही त्यांनी जाहीर केले. सुप्रिया देवघरे यांनी सूत्रसंचालन केले.

- Advertisement -

मानसिक आरोग्य जपा

‘घरौंदा बनाने मे हम इतने मश्गूल हो गये, उडने के लिए पंख थे ये भी भूल गए’ हा शेर उद्धृत करीत हिमगौरी आडके यांनी महिलांच्या रोजच्या आयुष्यातील ताणतणावांवर प्रकाश टाकला. त्या म्हणाल्या, नव्या तंत्रज्ञानाच्या अतिरेकी वापरामुळे आपल्या आयुष्यातील ताणतणाव वाढले आहेत. यामुळे अनेक शारीरिक मानसिक आजारांचं प्रमाण वाढले आहे. अनेक छोट्या छोट्या गोष्टींचा ताण आपण घेतो. आपण सोडून द्यायलाही शिकले पाहिजे. कुठल्या गोष्टींचा ताण घ्यावा किंवा घेऊ नये, याचा आपल्या पातळीवर विचार करावा. रुढी, परंपरांतील अतार्कित बाबींकडे दुर्लक्ष करा. भावनांचं व्यवस्थापन करता आलं तर, त्याचा आयुष्य सुंदर होण्यास अधिक उपयोग होईल. महिला दिन आनंदाने साजरा होत असताना त्यातील उत्साह आणि उर्जेचा उपयोग होणे आवश्यक आहे.

हेही वाचा – नाशिकमध्ये रंगला ‘ती’च्या सन्मानाचा अविस्मरणीय उत्सव!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -