घरमहाराष्ट्रनाशिकनाशिकमध्ये रंगला ‘ती’च्या सन्मानाचा अविस्मरणीय उत्सव!

नाशिकमध्ये रंगला ‘ती’च्या सन्मानाचा अविस्मरणीय उत्सव!

Subscribe

आपलं महानगर एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरच्या महिला दिन कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद, तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनातून मिळाला स्वत:कडे पाहण्याचा नवा दृष्टीकोन

आयुष्य खूप सुंदर आहे. प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊ या, याची जाणीव करुन देणारा..तीला तीचं खरंखुरं आरोग्यभान देणारा आरोग्य उत्सव ‘ती’च्या अस्तित्वाची नवी ओळख करुन देणारा ठरला. दैनिक ‘आपलं महानगर’ आणि एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरच्या वतीने महिला दिनी अर्थात शुक्रवारी, ८ मार्चला हा आरोग्यदायी उत्सव शेकडो महिलांच्या उपस्थितीत रंगला.

या सोहळ्यात प्रसिध्द कर्करोगतज्ज्ञ डॉ. राज नगरकर, डॉ. रणजीत जोशी आणि स्थायी समितीच्या माजी सभापती हिमगौरी आहेर-आडके यांनी बहुमुल्य मार्गदर्शन केले. यातून आतापर्यंत न सापडलेली स्वत:ची नवी ओळख मिळाल्याची उत्स्फूर्त प्रतिक्रिया महिलांमधून व्यक्त झाली. भाभा नगर येथील मानवता कॅन्सर सेंटरच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात महिलांना आरोग्य संवर्धनाचे धडे त्यांच्याशी संवाद साधत देण्यात आलेत. महिलांच्या आनंदी आणि सुदृढ जीवनशैली या विषयावर डॉ. राज नगरकर यांनी संवाद साधला. तर गर्भाशयाचा कर्करोग अर्थात सर्व्हायकल कर्करोग, घ्यावयाची काळजी आणि उपाययोजना या विषयी डॉ. रणजीत जोशी यांनी मार्गदर्शन केले. हिमगौरी आडके यांनी महिलांना मानसिक पातळीवर सक्षम राहण्याचे आवाहन केले. पाहुण्यांचे स्वागत ‘आपलं महानगर’चे मुख्य संपादक संजय सावंत, नाशिक आवृत्तीचे निवासी संपादक मिलिंद सजगुरे यांनी केले. नगरसेविका समीना मेमन यांच्यासह प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते रणरागिणींचा सन्मान करण्यात आला.

- Advertisement -

या रणरागिणींचा सन्मान

विविध क्षेत्रात कर्तृत्वाचा ठसा उमटवलेल्या वरुण अ‍ॅग्रो फुड प्रोसेसिंग कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालिका मनीषा धात्रक, अभ्युदय बँकेच्या खातेदार मनोरमा भुतडा, मानकर बॅग हाऊसच्या संचालिका अर्चना मानकर, सृष्टी हर्बल कंपनीच्या संचालिका सुनीता जोशी, सोनी पैठणीच्या संचालिका सिध्दी सोनी, गित योगा फिटनेस अकादमीच्या काजल पटणी, हॉलीडे लव्हर्स, नाशिकरोडच्या सुजाता मोकळ, मॉ फाऊंडेशनच्या अध्यक्षा अक्सा इरफान शेख, इंडोनेशिया नेपाळ योगा स्पर्धेत रौप्य पदक मिळविलेल्या प्रा. वंदना रकिबे, अ‍ॅचिव्हर्स ब्युटी असोसिएशनच्या अध्यक्षा ललिता पाटोळे, मिसेस इंडिया इंटरनॅशनल क्विन मनिषा शिंदे, युवा साहित्यिक शरयू पवार, फिटनेस ट्रेनर प्रज्ञा भोसले-तोरसकर, लॅन्डस्केप आर्टिस्ट अमी छेडा या रणरागिणींचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान झाला.

हेही वाचा – जीवनशैलीत सकारात्मक बदल करा; आरोग्याला प्राधान्यक्रम द्या!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -