घरताज्या घडामोडीमोदी सरकारला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी विरोधी पक्ष एकत्र येणार, नवाब मलिक यांची...

मोदी सरकारला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी विरोधी पक्ष एकत्र येणार, नवाब मलिक यांची माहिती

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार देशातल्या सर्व राजकीय पक्षांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करतील. त्यामुळे विरोधी पक्ष एकत्र येतील आणि मोदी सरकार सत्तेतून बाहेर जाईल. असं आमचं म्हणणं आहे. तरीही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जेव्हा शाळेत होते. जेव्हा १९८४ साली देशात लोकसभेची निवडणूक झाली होती. तेव्हा भाजपची संख्या ही २ वर गेली होती. आणि तुमचे खासदार सायकलवर बसून डबलसीटने संसदेत जात होते. हे तुम्ही विसरलात काय?, ही लोकशाही असल्यामुळे अमृत पिऊन कोणीही सत्तेत बसत नाही. असं राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

नवाब मलिक यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी मलिक म्हणाले की, जेव्हापासून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे शरद पवार यांच्यावर टीका करत आहेत. तेव्हाच चमत्त्कार घडत आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी शरद पवार यांचे राजकरण संपलंय असं फडणवीस म्हणाले होते. ही टीका केल्यानंतरही चमत्कार घडतील आणि २०२४ मध्ये देखील आम्ही चमत्कार घडवून दाखवू. असं नवाब मलिक म्हणाले.

- Advertisement -

संजय राऊतांवर कारवाई

सत्तेचा दुरूपयोग भाजपच्या वतीन होत आहे हे नवीन नाही. कारण कोणाही त्यांच्याविरोधात बोलत आहेत. त्यांच्या विरोधात सत्तेचा दुरूपयोग होत आहे. कायदेशीर कारवाईला शिवसेनेचे खासदार संजय राऊत नक्कीच सामोर जातील. तसेच त्यानंतर भाजप नेते उघडे पडतील.

गोवा, महाराष्ट्र व उत्तर प्रदेश निवडणूक

उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षासोबत आमचं बोलणं सुरू आहे. मत विभाजन होऊ नये, असे आमचे म्हणणे आहे. जो ताकदीने निवडणुकीत उभा राहतो. त्याच्या पाठिशी उभे रहायला पाहीजे. अशी भूमिका उत्तर प्रदेशच्या बाबतीत आहे.

- Advertisement -

गोव्यामध्ये काँग्रेसचे नेत्यांशी बोलणं झालेलं आहे. परंतु त्यांच्याकडून काहीही प्रतिसाद मिळालेला नाहीये. निश्चितरूपाने गोव्यामध्ये सर्व पक्ष एकत्र झाले पाहीजेत. या भूमिकेत आम्ही पुढे जाऊ शकतो. शेवटी काँग्रेसने निकाल घेतल्यानंतर ते शक्य होईल. काँग्रेस गोव्यामध्ये मोठा पक्ष असल्यामुळे सर्वांना एकत्र घेऊन जाण्याची त्यांची जबाबदारी आहे. दरम्यान, दुसरीकडे खासदार संजय राऊत यांनी गोव्यात स्वबळावर लढणार असल्याचं सांगितलं आहे. परंतु काँग्रेस पक्ष जो निर्णय घेईल तो अंतिम निर्णय असेल. असेल राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक म्हणाले.


हेही वाचा: केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना काळं फासण्याचा डाव?, हिंगणघाटच्या आमदारांची ऑडिओ क्लीप व्हायरल…


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -