घरताज्या घडामोडीकुणाच्याच घराबाहेर आंदोलन करणं योग्य नाही, नवाब मलिकांचे काँग्रेसच्या भूमिकेवर सूचक विधान

कुणाच्याच घराबाहेर आंदोलन करणं योग्य नाही, नवाब मलिकांचे काँग्रेसच्या भूमिकेवर सूचक विधान

Subscribe

प्रशासनावर ताण पडतो, पोलीस यंत्रणेवर ताण निर्माण होतो यामुळे पुढे प्रत्येक पक्षाने बैठक घेऊन चर्चा केली पाहिजे आणि या प्रकारचे आंदोलन नको हे असे आपले स्पष्ट मत असल्याचे नवाब मलिक म्हणाले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसनं दिला होता. फडणवीसांच्या घराच्या दिशने काँग्रेस नेत्यांचा मोर्चा येत होता. यामध्ये वारकरीसुद्धा सहभागी होते. परंतु नेत्याच्या घराबाहेर अशा प्रकारे आंदोलन करण्याची भूमिका घेणं योग्य नाही असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केले आहे. नवाब मलिकांचे विधान राष्ट्रवादीचा काँग्रेसला विरोध असल्याचे दर्शवते आहे. दरम्यान यामुळे महाविकास आघाडीमध्ये संभ्रम असल्याचे दिसत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपविरोधात काँग्रेसनं काढलेल्या मोर्चाला विरोध असल्याचे समोर आलं आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात मुंबईत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या घराबाहेर आंदोलन करण्यात आले. यावर राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांनी प्रतिक्रिया दिली आहे. नवाब मलिक म्हणाले की, आज जे काँग्रेसच्या वतीने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीसांच्या घरावर आंदोलन करण्याची भूमिका घेतली होती. ती भूमिका योग्य नाही. कुठल्याही राजकीय पक्षाने नेत्यांच्या घरी आंदोलन करणे किंवा राजकीय पक्षाच्या समोर आंदोलन करणं हे योग्य नाही असे सूचक विधान नवाब मलिकांनी केलं आहे.

- Advertisement -

दरम्यान नवाब मलिक पुढे म्हणाले की, हे नवीन पायंडा आहे. कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी करण्याची परिस्थिती निर्माण करणे. आपण लोकशाहीमध्ये विरोध करणे आपल्या आधिकारात असताना जे सरकारने प्रशासनाने न्यायालयाने निश्चित करुन दिलेली जागा आहे. परवानगी घेऊन प्रत्येक पक्षाला आंदोलन करण्याचे अधिकार आहेत. तो काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना असेल राजकीय पक्षाच्या कार्यालयासमोर आंदोलन पुकारतील हे जे नवीन सुरुवात झाली आहे. ती योग्य नाही. यापासून प्रत्येक राजकीय पक्षाने आणि नेत्याने असे काही करु नये अशी आमची पक्षाची भूमिका आहे. यामुळे प्रशासनावर ताण पडतो, पोलीस यंत्रणेवर ताण निर्माण होतो यामुळे पुढे प्रत्येक पक्षाने बैठक घेऊन चर्चा केली पाहिजे आणि या प्रकारचे आंदोलन नको हे असे आपले स्पष्ट मत असल्याचे नवाब मलिक म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात जास्त घोटाळे

कोरोना संसर्ग पसरण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे काही बोलले आहे त्याबाबत आमच्या सदस्यांनी स्पष्ट मत संसदेत मांडले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी मत मांडले असल्याची माहिती नवाब मलिकांनी दिली आहे. तसेच पंतप्रधान मोदींच्या काळाळत जास्त घोटाळे झाले आहेत. आताच दोन दिवसांपूर्वी २३ हजार कोटींचा बँक घोटाळा उघडकीस आला आहे. २०१५ मध्ये तक्रार करण्यात आली होती तरी सीबीआयने गुन्हा दाखल केला नव्हता असा घणाघात नवाब मलिकांनी केला आहे. मोदींच्या काळात एकूण साडेपाच लाख कोटी रुपयांचे घोटाळे झाले आहेत. घोटाळेबाजांवर कारवाई करण्यात येत नाही. अनेक घोटाळ्यांमध्ये भाजप नेत्यांचा थेट संबंध असल्याचा आरोप नवाब मलिकांनी केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : मुंबईत प्रचंड वाहतूक कोंडी, फडणवीसांच्या बंगल्याबाहेरील कॉंग्रेसचे आंदोलन मागे, नाना पटोलेंची घोषणा

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -