घरताज्या घडामोडीमुंबईत प्रचंड वाहतूक कोंडी, फडणवीसांच्या बंगल्याबाहेरील कॉंग्रेसचे आंदोलन मागे, नाना पटोलेंची घोषणा

मुंबईत प्रचंड वाहतूक कोंडी, फडणवीसांच्या बंगल्याबाहेरील कॉंग्रेसचे आंदोलन मागे, नाना पटोलेंची घोषणा

Subscribe

महाराष्ट्रात कॉंग्रेसने कोरोना पसरवला या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानानंतर महाराष्ट्र कॉंग्रेसने आंदोलनाची हाक दिली होती. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय सागर बंगल्याबाहेर आंदोलन करण्याचा पवित्रा कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी घेतला होता. पण त्याआधीच भाजपही आक्रमक झाल्याचे दिसले. भाजपकडूनही अनेक नेत्यांच्या नेतृत्वात कॉंग्रेसविरोधी आंदोलन करण्यात आले. दरम्यानच्या काळात भाजप आणि कॉंग्रेस अशा दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांची धरपकड पोलिसांकडून करण्यात आली. पण मुंबईतील अडचणी लक्षात घेता महाराष्ट्र कॉंग्रेसकडून आंदोलन मागे घेण्यात आले. तर देवेंद्र फडणवीस यांनीही या आंदोलनाला नौटंकी म्हटले आहे. या आंदोलनामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचेही पहायला मिळाले. मुंबईत अनेक ठिकाणी कॉंग्रेस आणि भाजपच्या आंदोलनामुळे मुंबईकरांची मोठी गैरसोय झाली.

- Advertisement -

भाजपने भाडोत्री माणस रस्त्यावर उतरवली. लोकांच्या गैरसोयी आणि अडचणी लक्षात घेऊनच आंदोलन मागे घेतल असल्याचे नाना पटोले यांनी जाहीर केले. मुंबईकरांची गैरसोय नको म्हणून आंदोलन थांबवत आहोत, असेही नाना पटोलेंनी स्पष्ट केले.

कोणाचीही हिंमत नाही, इथे येऊन निदर्शने करण्याची – देवेंद्र फडणवीस

कोणाचीही हिंमत नाही, ते इथ येऊन निदर्शने करतील. मोदीजींनी माफी मागण्याचा सवाल नाही. कॉंग्रेसने देशाचा बट्याबोळ केला आहे. हे सगळे नौटंकीबाज लोक आहेत, कितीही नौटंकी केली तरीही करूद्यात, अशा शब्दा नाना पटोलेंच्या आंदोलनाचा समाचार फडणवीस यांनी घेतला. नाना पटोलेंची ही सगळी नौटंकी असल्याचेही फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

कॉंग्रेसची अपयश झाकण्याची नौटंकी असल्याचे मत भाजप नेते राम कदम यांनी व्यक्त केले. दिल्लीत महत्व वाढाव म्हणून कॉंग्रेसचे आंदोलन असल्याचेही ते म्हणाले. आदरणीय पंतप्रधानांनी सत्यकथन केले आहे, पराजय लपवण्यासाठी नौटंकी असल्याचेही ते म्हणाले. हायकमांडसमोर किंमत वाढवण्यासाठी हा सगळा स्टंट असल्याचे ते म्हणाले. दिल्लीतील हायकमांड दोन महिने भेटत नाही, इतर पक्ष महत्व देत नाहीत. अशा स्थितीत पोलीस दलाचा गैरवापर करत भाजपच्या कार्यकर्त्यांना अटक केल्याचा आरोपही त्यांनी केला.

केम्स कॉर्नर, कुलाबा, घाटकोपर अशा अनेक ठिकाणी भाजप पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नोटीसा दिल्या. आमदार तसेच खासदारांना नोटीसा देण्यात आल्या. पोलिसांनी मलबार हिल पोलीस ठाण्यात नेत्यांना अटकही केली. मुंबई पोलिसांची झुंडशाही महाराष्ट्राने पाहिल्याचा आरोप भाजप नेते आशिष शेलार यांनी केला.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -