घरमहाराष्ट्रगडचिरोलीत नक्षलवाद्यांच्या बंदला गावकऱ्यांच चोख प्रत्युत्तर

गडचिरोलीत नक्षलवाद्यांच्या बंदला गावकऱ्यांच चोख प्रत्युत्तर

Subscribe

बॅनरच्या माध्यमातून माओवाद्यांनी येत्या १९ मे रोजी गडचिरोली जिल्हा बंदचं आवाहन केलं आहे. या बंदसाठी नक्षलवाद्यांनी एट्टापली तालुक्यातील गुरूपल्ली मार्गावर तसेच आलापल्ली मार्गावर बॅनर लावले आहेत.

गडचिरोली जिल्ह्यात गेल्या २७ एप्रिलला झालेल्या चकमकीत रामको आणि शिल्पा या दोन महिला नक्षलवादी ठार झाल्या होत्या. त्याविरोधात नक्षलवाद्यांनी गडचिरोली जिल्हा बंद करावा असे आवाहन केले आहे. रविवारी गडचिरोली बंद झाले आहे. या बंग गावकऱ्यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. ‘भारत माता की जय’ असे नारे गावकऱ्यांनी दिले.
बॅनरच्या माध्यमातून माओवाद्यांनी येत्या १९ मे रोजी गडचिरोली जिल्हा बंदचं आवाहन केलं आहे. या बंदसाठी नक्षलवाद्यांनी एट्टापली तालुक्यातील गुरूपल्ली मार्गावर तसेच आलापल्ली मार्गावर बॅनर लावले आहेत. दुर्गम भागात काही ठिकाणी लाल रंगाचे बॅनर मोठ्या प्रमाणात लावले आहेत.

गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी पुकारला संप

नक्षलवाद्यांनी पुकारलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीतील एटापल्ली-आलापल्ली मार्गवर झाडे तोडून मार्ग बंद केला आहे. केवळ झाडे तोडली नाही तर त्या ठिकाणी असलेली वनविभागाची लाखो रुपयांची लाकडे पेटवून दिली आहेत. नक्षलवाद्यांनी रस्ता बंद केल्याने एटापल्लीहून आलापल्लीकडे जाणा-या बसेस एटापल्लीतच थांबल्या आहेत. नक्षलवाद्यांच्या या बंदमुळे गडचिरोली ठप्प झाली आहे. काही वाहनांचीही जाळपोळ नक्षलवाद्यांकडून करण्यात आली आहे.

- Advertisement -
गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी पुकारला संप

नक्षलवाद्यांकडून केला जाणार बंद आणि गेल्या १ मेपासून जिल्हयात नक्षलवाद्यांनी सुरु केलेल्या हिंसक कारवाया यामुळे जिल्ह्यात हायअलर्ट जारी केला आहे. नक्षलग्रस्त भागातील पोलीस ठाण्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -