घरदेश-विदेशसलग दुसऱ्या दिवशी पवार-नायडूंमध्ये बंद खोलीत चर्चा

सलग दुसऱ्या दिवशी पवार-नायडूंमध्ये बंद खोलीत चर्चा

Subscribe

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातील अंतिम टप्पा संपल्यानंतर विरोधकांच्या दिल्लीतील हालचालींना वेग आलेला आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलगू देशम पार्टीचे नेते चंद्राबाबू नायडू यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची सलग दुसऱ्या दिवशी भेट घेतली आहे. तसेच संध्याकाळी चंद्राबाबू नायडू युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचीही भेट घेणार आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे निकालनंतरची विरोधकांची रणनीती ठरवण्याला नायडू बळ देताना पाहायला मिळत आहेत.

कालही घेतली होती पवारांची भेट 

काल, शनिवारीदेखील चंद्राबाबू नायडू यांनी भेटींचा सपाटा लावला होता. नायडू यांनी सकाळी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांची सुमारे तासभर चर्चा झाली. बिगर भाजप सर्व पक्षांना एकत्र कसे आणता येईल, यावर त्यांच्यात खल झाला. केंद्रातील सत्ता स्थापण्यासाठी भाजप आणि ‘रालोआ’मधील सध्याचे घटकपक्ष वगळता इतर सर्व पक्षांना एकाच छताखाली आणण्याची गरज असल्याचे आणि त्यासाठी सर्वच वरिष्ठ नेत्यांनी पुढाकार घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. कोणालाही बहुमत नाही त्यानंतर नायडू यांनी कम्युनिस्ट नेते डी. राजा आणि सुधाकर रेड्डी यांचीही भेट घेतली. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी दोन्ही नेत्यांना केले. त्यानंतर त्यांनी भेट घेतली, ती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि लोकतांत्रिक जनता दलाचे नेते शरद यादव यांची. लोकसभेच्या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता नसल्याचा अंदाज वर्तविण्यात आल्याने नायडू यांनी विरोधकांची मोट बांधण्याच्या दृष्टीने भेटीगाठींवर जोर दिला असल्याचे सांगण्यात आले. त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी, ‘आप’चे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांच्याशी यापूर्वीच चर्चा केली आहे. त्यांना महाआघाडीत सामील होण्याची गळ त्यांनी घातली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -