घरमहाराष्ट्रशिंदे सरकार मराठा युवा सेनेतील युवकांची माथी भडकवतायत; राष्ट्रवादीचा आरोप

शिंदे सरकार मराठा युवा सेनेतील युवकांची माथी भडकवतायत; राष्ट्रवादीचा आरोप

Subscribe

मुंबई – राज्यातील राजकीय सत्तांतरानंतर शिवसेनात उभी फूट पडली. शिवसेनेत ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट तयार झाले. दरम्यान दोन्ही गटांकडून शिवसेना आमचीच असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे शिंदे गट आणि ठाकरे गटातील संघर्ष विकोपाला पोहचला आहे. यातच दोन्ही गटाच्या वादात राष्ट्रवादी काँग्रेसनेही उडी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून ठाकरे गटाची बाजू घेत शिंदे सरकारवर टीका केली जात आहे. मराठा युवा सेनेच्या काही तरुण पदाधिकार्‍यांची माथी भडकवण्याचे पाप शिंदेसरकार करत आहे असा थेट हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे.

खासदार सुप्रियाताई सुळे, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे काम शिंदेसरकार करत आहे का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे असेही महेश तपासे म्हणाले. अंकुश कदम या मराठा युवा सेनेच्या पदाधिकाऱ्याने एक व्हिडिओ पोस्ट करुन त्यात पवारसाहेबांनी तरुणांसाठी काय केले हा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यावर महेश तपासे यांनी त्याच्या व्हिडीओचा अजिबात राग नाही परंतु अंकुश कदमाचे जेवढे वय आहे त्याच्यापेक्षा जास्त सामाजिक, राजकीय कारकिर्द आदरणीय शरद पवारसाहेबांची आहे याची आठवण करून दिली आहे.

- Advertisement -

राज्यात युवा, महिला, ज्येष्ठ नागरिक, तृतीयपंथीयाबाबतचे धोरण असो खासदार सुप्रियाताई सुळे यांनी पुढाकार घेऊन समाजात आदरयुक्त स्थान मिळेल यासाठी प्रयत्न केले आहेत. काम करतात म्हणून खासदार सुप्रियाताई सुळे यांना सात वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे एवढी तरी माहिती अंकुश कदमने घ्यावी असे जाहीर आवाहन महेश तपासे यांनी केले.


हेही वाचा : मराठा विद्यार्थ्यांना 60 हजार वार्षिक भत्ता; चंद्रकांत पाटलांची माहिती

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -