घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्र'५० खोके, एकदम ओके' अशी घोषणाबाजी करत राष्ट्रवादीने साजरा केला 'गद्दार दिन'

‘५० खोके, एकदम ओके’ अशी घोषणाबाजी करत राष्ट्रवादीने साजरा केला ‘गद्दार दिन’

Subscribe

नाशिक : २० जून २०२२ रोजी एकनाथ शिंदे यांच्या सह शिवसेनेच्या ४० आमदारांनी ऐतिहासिक बंड केल होत. या घटनेची आज वर्षपूर्ती होत आहे. त्यानिमित्ताने शिंदे गटाने केलेल्या बंडाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने नाशिक शहरात गद्दार दिन साजरा करत खोक्याच्या प्रतिकृती हातात घेत ५० खोके एकदम ओके अशा घोषणा देत निदर्शने केली.

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील वर्षी याच दिवशी बंड केल्यामुळे शिवसेनेत मोठी फूट पडली. विधान परिषद निवडणुकीच्या निकालाच्या रात्रीच म्हणजेच २० जून २०२२ रोजी एकनाथ शिंदे यांनी समर्थक आमरांना सोबत घेऊन शिवसेनेत बंड केले होते. यानंतर एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांसह सूरत गाठले. त्यावेळी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या. मुख्यमंत्री पदावर असलेल्या उद्धव ठाकरे यांनी पुढे जाऊन राजीनामा दिला. एकनाथ शिंदे आपल्या समर्थक आमदारांसह आधी सूरत तिथून गुवाहाटीला गेले होते.

- Advertisement -

शिवसेनेच्या त्या ४० आमदार तसेच अपक्ष १० आमदारांच्या बंडानंतर महाराष्ट्राच राजकारण १८० अंशाच्या कोणात फिरले होते. या सर्व घडामोडी घडून आज एक वर्ष पूर्ण झाले. या निमित्ताने राष्ट्रवादीने गद्दार दिन साजरा केला. यावेळी शहराध्यक्ष रंजन ठाकरे, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, योगिता आहेर, संजय खैरनार, विष्णुपंत म्हैसधुणे, गौरव गोवर्धने, समीना मेमन, मकरंद सोमवंशी, मनोहर कोरडे, शंकर मोकळ, राजाराम धनवटे, जीवन रायते, मुजाहिद शेख, प्रशांत वाघ, नदीम शेख, मुरलीधर भामरे, राजेंद्र शेळके, सागर लामखेडे, संतोष जगताप, गौतम पगारे, राजेश भोसले, दीपक वाघ, नाना पवार, सुनिल अहिरे, पूजा आहेर, डॉ.संदीप चव्हाण, मुकेश शेवाळे, जय कोतवाल आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी गद्दारी केली असा आरोप संपूर्ण महाराष्ट्रातील गावागावात होत आहे. त्याचा निषेध नोंदविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने गद्दार दिन साजरा करण्यात येत आहे. : रंजन ठाकरे, शहराध्यक्ष

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -