घरदेश-विदेशभारतीयांना लस देण्यात स्लो, विदेशात लस पोहोचवण्यात आम्ही फास्ट

भारतीयांना लस देण्यात स्लो, विदेशात लस पोहोचवण्यात आम्ही फास्ट

Subscribe

जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचा केंद्राला टोला

केंद्र सरकार भारतीयांना लस देण्यात स्लो आहे, मात्र, विदेशात खासकरुन पाकिस्तानसारख्या आपल्या मित्र राष्ट्राला लस देण्यात फास्ट आहोत, असं सणसणीत टोला जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केंद्राला लगावला. भारतात विकसित करण्यात आलेली लस भारतीय लोकांना आधी न देता परदेशात का दिली जात आहे, याचं उत्तर प्रकाश जावडेकर यांनी द्यावं असं जयंत पाटील म्हणाले. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्र्यांशी कोरोनासंदर्भात चर्चा करणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीची बैठक पार पडली.

या बैठकीत पंतप्रधानांकडे काय मागणी करावी? तसंच मंत्र्यांच्या खातेसंदर्भातील कामांबाबत चर्चा झाली, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली. गृहखात्याच्या कारभारात शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे शरद पवार प्रचंड नाराज असल्याचं वृत्त जयंत पाटील यांनी फेटाळलं. या बैठकीत अशी चर्चाच झाली नाही, असं जयंत पाटील म्हणाले. तसंच सरकारमध्ये कुठलेही मतभेद नसल्याचं देखील जयंत पाटील यांनी सांगितलं.

- Advertisement -

NIA च्या अधिकाऱ्यांनी चौकशी झाल्यावर माहिती द्यावी

सध्या स्फोटकांची स्कॉर्पिओ आणि सचिन वाझे प्रकरणाची चौकशी NIA करत आहे. या तपासातील माहिती NIA टप्प्याटप्प्याने देत आहे. यावर जयंत पाटील यांनी आक्षेप घेतला आहे. NIA ने संपूर्ण तपास करुनच माहिती द्यावी, असं जयंत पाटील म्हणाले.

 

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -