घरठाणेझाडं कापण्यावरून जितेंद्र आव्हाडांचा संताप, म्हणाले, 'कायदा आहे की नाही...'

झाडं कापण्यावरून जितेंद्र आव्हाडांचा संताप, म्हणाले, ‘कायदा आहे की नाही…’

Subscribe

ठाण्यातील अनेक प्रश्नांवरून मागील अनेक दिवसांपासून आमदार जितेंद्र आव्हाड प्रश्न उपस्थित करत आहेत. ट्विटरच्या माध्यमातून ठाण्यातील अनेक समस्या सरकारला घेरण्याचा जितेंद्र आव्हाड प्रयत्न करत आहेत. नुकताच जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यात असलेल्या मफतलाल कंपनीच्या जमिनी अनेकांनी लुटल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे.

ठाण्यातील अनेक प्रश्नांवरून मागील अनेक दिवसांपासून आमदार जितेंद्र आव्हाड प्रश्न उपस्थित करत आहेत. ट्विटरच्या माध्यमातून ठाण्यातील अनेक समस्या सरकारला घेरण्याचा जितेंद्र आव्हाड प्रयत्न करत आहेत. नुकताच जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यात असलेल्या मफतलाल कंपनीच्या जमिनी अनेकांनी लुटल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. तसेच, याठिकाणी गेल्या काही दिवसांमध्ये या ठिकाणी रातोरात झाडे कापली गेली आणि एका मोठ्या पट्ट्यामध्ये अनधिकृत झोपडपट्टी बांधण्याचे प्लॅनिंग सुरु झाल्याचेही आव्हाडांनी सांगितले. (ncp leader Jitendra Awhad angry over cutting trees in thane vvp96)

जितेंद्र आव्हाडांच्या ट्वीटमध्ये काय?

- Advertisement -

मफतलाल कंपनी बंद होऊन गेली अनेक वर्षे झाली. अनेकांनी मफतलालच्या जमिनी लुटल्या. उच्च न्यायालयाने अखेर दखल घेऊन ही जमिन सुरक्षित ठेवण्यासाठी जवळ-जवळ 175 एकरमध्ये कंपाऊंड बांधले. त्या ठिकाणी अनधिकृत झोपड्या होऊ नयेत यासाठी मी लोकप्रतिनिधी या नात्याने कायम लक्ष ठेवून असायचो. तसेच तेथिल सुरक्षा अधिकारी देखिल सतर्क असायचे. परंतु, गेल्या काही दिवसांमध्ये या ठिकाणी रातोरात झाडे कापली गेली आणि एका मोठ्या पट्ट्यामध्ये अनधिकृत झोपडपट्टी बांधण्याचे प्लॅनिंग सुरु झाले आहे.

अजून कामगारांचे पैसे मिळालेले नाही. अर्धेअधिक कामगार स्वर्गवासी झाले. कमीत-कमी त्या कामगारांचे पैसे मिळतील या दृष्टीने मी उच्च न्यायालयामध्ये लढाई दिली. मी सरकारमध्ये मंत्री असताना आम्ही 700 कोटी रुपयांना ही जमीन विकत घ्यायला तयार होतो. ज्यामध्ये म्हाडामधून कामगारांना 300 कोटी रुपये देता आले असते. पण, माझे मंत्रीपद गेल्यामुळे मी पुढे काही करु शकलो नाही. पण, ही जागा सुरक्षित ठेवण्याची या मतदार संघाचा आमदार म्हणून माझी जबाबदारी आहे.

- Advertisement -

ठाणे महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना याबद्दल सगळं माहित आहे. कारण, महापालिकेचे कार्यकारी अभियंता तायडे यांच्याशी कोण उद्धटपणाने बोललं, हे देखिल तायडे यांना कोणीतरी विचारावे. पण, असा जर कारभार चालणार असेल आणि कोणाचीही पर्वा न करता अनधिकृत बांधकामांसाठी 20 ते 40 वर्षांपासूनची असलेली 500 पेक्षा अधिक झाडे कापली जाणार असतील, तर मात्र आता कायदा आहे की, नाही हा प्रश्न विचारावा लागेल?


हेही वाचा – Corona Alert: मुंबईत सर्व BMC रुग्णालयांत उद्यापासून मास्कसक्ती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -