घरमहाराष्ट्रदाढीवाला चोर कोण? आशिष शेलारांनी स्पष्ट करावं; नवाब मलिकांचा टोला

दाढीवाला चोर कोण? आशिष शेलारांनी स्पष्ट करावं; नवाब मलिकांचा टोला

Subscribe

मोदी सरकारने नव्याने सहकार मंत्रालयाची स्थापना केल्याने वादविवाद सुरु आहेत. सहकार मंत्रालयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया देताना राज्यघटनेनुसार सहकार हा विषय राज्य सरकारचाच आहे, असं म्हटलं. त्यावर टीका करताना भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी चोर के दाढी में तिनका, असं म्हटलं. दरम्यान, आता आशिष शेलार यांच्या टीकेला राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. दाढीवाला चोर कोण? हे आशिष शेलारांनी स्पष्ट करावं, असा टोला मलिक यांनी लगावला. ते सोमवारी पत्रकार परिषदेत बोलत होते.

“शरद पवार यांनी सहकार मंत्रालयावर भाष्य केल्यानंतर आशिष शेलार यांनी सांगितलं की चोर के दाढी में तिनका. तो दाढीवाला कोण आहे? त्याचं नाव पण आशिष शेलार यांनी घेतलं पाहिजे. आम्ही कोणाला चोर म्हणत नाही. स्वत: आशिष शेलार यांनी तसं म्हटलं आहे, त्यामुळे त्यांनी त्या चोराचं नावं सांगावं,” असं नवाब मलिक म्हणाले.

- Advertisement -

सहकार हा विषय राज्याच्याच अंतर्गत

“अमित शहा या खात्याचे मंत्री झाल्यानंतर महाराष्ट्रातील काही भाजपचे नेते वेगळ्या पद्धतीने या विषयावर भाष्य करत आहेत. काही लोकं धमकी देण्याची सुरुवात केली. अमित शहा या खात्याचे मंत्री झाल्यानंतर या राज्यात सहकार क्षेत्रात काम करणारे जे नेते असतील, संस्था असतील त्यांचं काही खैर नाही. मी त्यांना सांगू इच्छितो सहकार हा विषय राज्य सरकारच्या अधिन असणार विषय आहे. जेव्हा मल्टी स्टेट सोसायट्या असतील तेव्हा केंद्राकडे हा विषय जातो. नव्याने खातं निर्माण करण्यात आलं आहे. कुठल्या पद्धतीने या खात्याकडे बघतंय, जोपर्यंत यामध्ये काही हालचाली होत नाही, तोपर्यंत नव्याने काही होणार नाही. उलट जे भाजपचे लोक धमक्या देत आहेत, त्यांना कळलं पाहिजे या प्रकारे एखाद्या नेत्याच्या नावाने धमकी देणं योग्य नाही. उलट शरद पवार कृषीमंत्री असताना सहकार खात्याला ९७ वी घटनादुरुस्ती करुन घटनात्मक तरतूद करण्यात आली. राजकीय तसंच शासकीय हस्तक्षेप होऊ नये यासाठी त्यांना अधिक स्वायत्ता देण्याची घटना दुरुस्ती करुन सर्व अधिकार देण्यात आले आहेत,” असं नवाब मलिक यांनी सांगितलं.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -