Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी शरद पवारांच्या उपस्थितीत मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक

शरद पवारांच्या उपस्थितीत मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडत आहे. ही बैठक मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये सुरू आहे. या बैठकीत आगामी निवडणुकीसंदर्भातील महत्त्वाचे मुद्यांवर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisement -

२०२४च्या लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाची काय रणनीती असेल? तसेच विधानसभा आणि पालिकांच्या निवडणुकींसंदर्भाचा आराखडा कसा असेल आणि राज्याच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

सत्तासंघर्षाचा निकाल ११ मे रोजी जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच शरद पवार यांच्या उपस्थितीत आज होणाऱ्या बैठकीकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. या बैठकीत अजित पवार, जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्व वरिष्ठ नेतेही उपस्थित आहेत.


- Advertisement -

हेही वाचा : त्र्यंबक प्रकरणी हिंदू महासभा आक्रमक, मंदिराच्या प्रवेशद्वाराचे केले शुद्धीकरण


 

- Advertisment -