घरमहाराष्ट्र'हा महाराष्ट्र कीर्तनाने पूर्णपणे घडला नाही की तमाशाने पूर्णपणे बिघडला नाही; कोल्हेंची...

‘हा महाराष्ट्र कीर्तनाने पूर्णपणे घडला नाही की तमाशाने पूर्णपणे बिघडला नाही; कोल्हेंची गोडसेच्या भूमिकेवर प्रतिक्रिया

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, खासदार अमोल कोल्हे यांच्या व्हाय आय किल्ड गांधी या नथुराम गोडसेंच्या भूमिकेतील चित्रपटावरून नवा वाद निर्माण झाला आहे. खासदार अमोल कोल्हे या चित्रपटात नथुराम गोडसेची भूमिका साकारात असल्याने हा वाद निर्माण झाला आहे. अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांनी यावर विरोध दर्शवला आहे. अमोल कोल्हेंचा या चित्रपटाचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे. ३० जानेवारीला हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. मात्र प्रोमो प्रदर्शित होताच होणाऱ्या विरोधावर आताा अमोल कोल्हे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “हा महाराष्ट्र कीर्तनाने पूर्णपणे घडला नाही की तमाशाने पूर्णपणे बिघडला नाही” असे त्यांनी म्हटले आहे. डॉ. अमोल कोल्हे यांनी यासंदर्भात फेसबुकवर एक पोस्ट केली आहे.

अमोल कोल्हे यांनी पोस्टमध्ये लिहिले की, २०१७ साली केलेला “Why I killed Gandhi” हा सिनेमा Limelight या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असं समजलं आणि अनेकांनी विचारलं डाॅक्टर तुम्ही नथुराम गोडसे या भूमिकेत? उत्तरादाखल मला कुठेतरी वाचलेलं वाक्य आठवलं- “हा महाराष्ट्र कीर्तनानं पूर्णपणे घडला नाही आणि तमाशानं पूर्णपणे बिघडला नाही!” या वाक्यातील नकारात्मक सूर बाजूला ठेवला तर मला या वाक्यात एक सकारात्मक गोष्ट जाणवते ती म्हणजे “Reel लाईफ” आणि “Real लाईफ” यातील फरक स्पष्ट करणारी सीमारेषा अधोरेखित करणं.”असेही अमोल कोल्हे यांनी म्हटले.

- Advertisement -

“कलाकार म्हणून भूमिका साकारत असताना काही भूमिका आव्हानात्मक असतातच आणि त्यांच्या विचारधारेशी सुद्धा आपण सहमत असतो आणि त्या साकारताना समाधानही मिळतं परंतु काही अशा भूमिका अचानक समोर येतात ज्या विचारधारेशी आपण सहमत नसतो पण कलाकार म्हणून त्या आव्हानात्मक असतात. अशीच ही भूमिका नथुराम गोडसे. मी व्यक्तिगत पातळीवर गांधीजींची हत्या तसेच नथुराम उदात्तीकरण या दोन्हीसाठी समर्थक नाही तरी समोर आलेल्या भूमिकेस न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. कलाकार म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर आणि व्यक्ती म्हणून विचारस्वातंत्र्याचा! याच मनमोकळेपणाने आपण या कलाकृतीकडे पहावं ही अपेक्षा! असं अमोल कोल्हे म्हणाले.


राज्यांना जानेवारीसाठी मिळणार दुप्पट कराची रक्कम, अर्थ मंत्रालयाचा आदेश


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -