ICC Rankings: एशेस जिंकत ऑस्ट्रेलियाची टेस्ट रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर उडी, भारताची घसरण

विश्व कसोटी चॅम्पियन न्यूझीलंड सध्या दुसऱ्या स्थानी कायम आहे. त्यांचे ११७ रेटिंग आहे. बंग्लादेशच्या विरुद्ध टेस्ट सिरीजमध्ये १-१ ची बरोबरी केली होती. भारताची पुढील महिन्यात श्रीलंकाविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे.

ICC Rankings Australia reach top in icc test rank india down in chart
ICC Rankings: एशेस जिंकत ऑस्ट्रेलियाची टेस्ट रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर उडी, भारताची घसरण

ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंड आणि भारताला मागे सोडत आईसीसी रँकिंगमध्ये पहिल्या स्थानी उडी घेतली आहे. कांगारुंना एशेस जिंकल्याचा फायदाच झाला असल्याचे पाहायला मिळत आहे. ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या मालिकेमध्ये इग्लंडला ४-० अशा फरकाने पराभूत केलं आहे. ऑस्ट्रेलियाचा रेटिंग पॉइंट सध्या ११९ आहे. ऑस्ट्रेलिया एशेसमध्ये कर्णधार पैट कमिंससोबत मैदानावर उतरली होती. माजी कर्णधार टिम पेनने मागील वर्षी डिसेंबरमध्ये कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. कमिंस आणि त्याच्या टीमने उत्तम कामगिरी करत इग्लंड, ब्रिस्बेन, एडिलेड, मेलबर्न आणि होबार्टवर मात केली आहे. तस इंग्लंडचा संघ १०१ पॉइंटसह चौथ्या स्थानी आहे.

भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकाविरुद्ध २-१ अशा फरकाने पराभूत झाल्याचा फटका बसला आहे. टीम पहिल्या स्थानावरुन घसरुन तिसऱ्या स्थानी आली आहे. भारतीय संघाचा सध्याचे रेटिंग ११६ आहे. संघाने डिसेंबरमध्ये न्यूझीलंडला पराभूत करुन पहिल्या स्थानी मजल मारली होती. परंतु यानंतर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिके सेंच्युरियनमध्ये पराभूत करत मालिकेची चांगली सुरुवात केली. परंतु जोहानिसबर्गमध्ये खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या आणि केपटाउनमधील तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. मालिका जिंकण्यासोबतच दक्षिण आफ्रिकेची रँकिंगमध्येही सुधारणा झाली आहे. दक्षिण आफ्रिका १०१ रेटिंगसह सातव्या स्थानावरुन पाचव्या स्थानी पोहोचली आहे. पाकिस्तान ९३ रेटिंगसह सहाव्या क्रमांकावर आहे.

विश्व कसोटी चॅम्पियन न्यूझीलंड सध्या दुसऱ्या स्थानी कायम आहे. त्यांचे ११७ रेटिंग आहे. बंग्लादेशच्या विरुद्ध टेस्ट सिरीजमध्ये १-१ ची बरोबरी केली होती. भारताची पुढील महिन्यात श्रीलंकाविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे.

हेही वाचा : Covid hits India U-19 team : टीम इंडियामध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव, ६ खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह