Kiran Mane: ‘मुलगी झाली हो’ नंतर किरण माने साकारणार ऐतिहासिक भूमिका, सिनेमाच्या शुटिंगला सुरुवात

अभिनेता किरण माने म्हणजेच स्टार प्रवाह वाहिनीवरील 'मुलगी झाली हो' या मालिकेतील विलास पाटील भुमिका साकारणारा अनेक दिवसांपासून वादाच्या कचाट्यात अडकला आहे. त्यामुळे मराठी सिनेसृष्टीतील वातावरण तापले आहे. अभिनेते किरण माने यांनी राजकीय पोस्ट केल्याचा आरोप करत त्यांना स्टार प्रवाहवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून काढून टाकण्यात आले आहे.

Kiran Mane: After 'Mulgi Jhali Ho', Kiran Mane will play a historical role
Kiran Mane: 'मुलगी झाली हो' नंतर किरण माने साकारणार ऐतिहासिक भूमिका, सिनेमाच्या शुटिंगला सुरुवात

अभिनेता किरण माने म्हणजेच स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतील विलास पाटील भुमिका साकारणारा अनेक दिवसांपासून वादाच्या कचाट्यात अडकला आहे. त्यामुळे मराठी सिनेसृष्टीतील वातावरण तापले आहे. अभिनेते किरण माने यांनी राजकीय पोस्ट केल्याचा आरोप करत त्यांना स्टार प्रवाहवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून काढून टाकण्यात आले आहे. या निर्णयाचा अनेक स्तरातून विरोध होत आहे. फक्त मनोरंजनसृष्टीतच नाही तर राजकीय वर्तुळातूनही किरण यांना पाठिंबा मिळत आहे. याशिवाय, किरण माने फेसबुक पोस्ट करत आपली भूमिक मांडण्याचा  प्रयत्न केला. दरम्यान, किरण माने यांनी त्यांच्या सोशल मिडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. दरम्यान, अनुप जगदाळे दिग्दर्शित ‘रावरंभा’ या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. या चित्रपटातील ऐतिहासिक भूमिकेसाठी किरण माने यांना विचारणा केल्याची माहिती त्यांनी फेसबुक पोस्टमधून दिली आहे.

 

रावरंभा’ या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी इतिहासातील योद्ध्याचे आयुष्य उलघडणार आहे. दरम्यान, दिग्दर्शक संजय जाधव हे पहिल्यांदाच ऐतिहासिक चित्रपटाचे छायांकन करणार आहेत. हा चित्रपट दिग्दर्शक अनुप जगदाळे याने दिग्दर्शित केला असून, कर्जतमधील एनडी स्टूडिओमध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे.रावरंभा या चित्रपटातून ऐतिहासिक प्रेमकहाणी समोर येणार आहे. या चित्रपटात अनेक कलाकार झळकणार असून आता त्यात किरण माने ऐतिहासिक भूमिका साकारणार आहेत. यासंदर्भात त्यांनी फेसबुक पोस्ट केली आहे. ‘आनंद वो…निव्वळ आनंद… नविन भन्नाट जबराट नादखुळा भुमिका ! सोबत प्रतिभावानांची टीम !! …, अशा आशयाचे कॅप्शन लिहिले आहे. याशिवाय किरण माने यांनी या वादा दरम्यान, त्यांच्यासोबत घडलेला किस्सादेखील शेअर केला आहे.

किरण माने यांच्या आरोपाबाबत ‘स्टार प्रवाह वाहिनी’चा खुलासा

अभिनेता किरण माने यांच्याविरोधात अनेक स्तरातून पाठिंबा तर काहीजण विरोध करत होते. दरम्यान, या सर्व प्रकरणावर स्टार प्रवाह वाहिनीने आता स्पष्टीकरण देत, किरण माने यांचे आरोप या वाहिनीने फेटाळले आहेत. स्टार प्रवाह वाहिनीने एक परिपत्रक जारी करुन म्हटले की, ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतील महिला कलाकारांसोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी किरण माने यांना या मालिकेतून काढून टाकण्यात आले. मालिकेतील अनेक सहकलाकारांनी त्यांच्याविरोधात अनेक तक्रारी केल्या होत्या.त्यामुळे किरण माने यांनी केलेले सर्व आरोप हे खोटे आहेत.याशिवाय “आम्ही सर्व कलाकार आणि त्यांच्या मतांचा आदर करतो. त्यामुळे इथे प्रत्येक व्यक्तीला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. त्यामुळे आम्ही आमच्या कलाकारांसाठी प्रामुख्याने महिलांना सुरक्षित करण्यासाठी वचनबद्ध आहोत”, असेही स्टार प्रवाह वाहिनीने परिपत्रकात म्हटले आहे.


हे ही वाचा – मराठी इतिहासातील योद्ध्याचे आयुष्य उलघडणाऱ्या ‘रावरंभा’ च्या चित्रीकरणाला सुरुवात