घरमहाराष्ट्रअनेक मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस युवा संघटनेने रोखला पुणे-मुंबई महामार्ग

अनेक मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस युवा संघटनेने रोखला पुणे-मुंबई महामार्ग

Subscribe

शेकडो कार्यकर्त्यांना घेतले पोलिसांनी ताब्यात

ना चोर ना चौकीदार मी तर बेरोजगार, गाजर नको रोजगार हवा, नरेंद्र देवेंद्र बेरोजगारीचे केंद्र अश्या विविध घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेस युवा संघटनेकडून पुणे-मुंबई महामार्ग रोखून काही मिनिटे आंदोलन केले. वाढती बेरोजगारी, महापरिक्षा पोर्टल रद्द करा, जुन्या कायद्या प्रमाणे पोलिसभर्ती करा अश्या विविध मागण्यासाठी कार्यकर्ते महामार्गावर उतरले होते. मुंबईहुन पुण्याच्या दिशेने येणारी वाहतूक वळवण्यात आली होती. दरम्यान, शंभर ते दीडशे कार्यकर्त्याना पोलिसांनी ताब्यात घेतले असून वाहतूक काही मिनिटांसाठी वळवण्यात आली होती. त्यामुळे याचा परिणाम वाहतुकीवर जाणवला नाही.

राज्यासह देशात बेरोजगारी वाढल्याने आंदोलन

पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग राष्ट्रवादी काँग्रेस युवा संघटनेने रोखून धरला. वाढती बेरोजगारी, महापरिक्षा पोर्टल रद्द करा या मागण्यांसाठी कार्यकर्ते आक्रमक झाले होते. उर्से टोल नाक्यावर काही मिनिटं हा मार्ग रोखण्यात आला. त्यानंतर तळेगाव पोलिसांनी संबंधित कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यानंतर मार्ग सुरू करण्यात आला. सध्या राज्यासह देशात बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे विविध संघटना आपापल्या पद्धतीने आंदोलन करत आहेत.

- Advertisement -

शेकडो पोलिसांचा फौजफाटा महामार्गावर

आज मंगळवारी पुणे मुंबई महामार्ग रोखून धरत राष्ट्रवादी काँग्रेस युवा संघटनेने आंदोलन केले. यावेळी कार्यकर्ते आक्रमक झाले होते. महामार्गावर उतरून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. कार्यकर्त्यांवर करडी नजर ठेवण्यासाठी शेकडो पोलिसांचा फौजफाटा महामार्गावर होता, रस्त्याला छावणीचे स्वरूप आले होते. मुंबईहून पुण्याच्या दिशेने येणारी वाहतूक वळवण्यात आली होती. त्यामुळे आंदोलनाचा म्हणावा तसा परिणाम वाहतुकीवर झालेला नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -